Barshitakali APMC
Barshitakali APMC Sarkarnama
विदर्भ

Bazar Samiti Result : बार्शीटाकळी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व; पण वंचितचीही दमदार 'एन्ट्री'

सरकारनामा ब्यूरो

Barshitakali APMC : बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे सुनील धाबेकर यांनी पुन्हा वर्चस्व राखले आहे. धाबेकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुरस्कृत शेतकरी संघर्ष पॅनलने सर्वाधिक १५ जागांवर विजय मिळविल्या आहेत. या पॅनलमध्ये आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात भाजपचे सदस्य आणि शिवसेनेचाही (ठाकरे गट) सहभाग होता. दरम्यान, प्रथमच बाजार समितीत वंचित बहुजन आघाडीने शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून शिरकाव केला आहे. वंचितला तीन जागा मिळाल्या आहेत.

अकोला जिल्ह्यातील (Akola) सातपैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले होते. त्यात बार्शीटाकळी बाजार समितीतील (Barshitakali) १८ जागांसाठी शनिवारी (ता. २९) मतमोजणी झाली. त्यात काँग्रेसप्रणित शेतकरी संघर्ष पॅनलने १५ जागा मिळवून सत्ता कायम राखली आहे. तर ग्रामपंचायत मतदारसंघातील तीन जागा वंचितच्या शेतकरी परिवर्तन पॅनलने जिंकल्या.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने (Vanchit) प्रथमच थेट बाजार समितीच्या निवडणुकीत उडी घेतली होती. शेतकरी संघर्ष पॅनलसोबत असलेल्या शिवसेनेचे दोन यांचा, भाजपचे तीन उमेदवारांचा विजय झाला आहे. उर्वरित दहा जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला.

विजयी उमेदवार

सेवा सहकारी संस्था

सर्वसाधरण : महादेव साबे (४९९), रमेश बेटकर (४९९), अशोक इंगळे (४९३), सुरेश शेंडे (४८६), अनिलकुमार राऊत (४८४), गोवर्धन सोनटक्के (४८३), प्रभाकर खांबलकर (४७२).

महिला राखीव गट: मंगला गोळे (५०६), गंगाबाई सोनटक्के (५०३).

इतर मागास वर्ग: महादेव काकड (५६४)

अनुसूचित (वि. जाती. भ. जमाती): अशोक राठोड (५२८)

ग्रामपंचायत

सर्वसाधारण: अशोक कोहर (३४३), कल्पना जाधव (३१५)

अनुसूचित जाती-जमातीः गोपाळ कटाळे (३२७)

हमाल व मापारी

शे. अजहर शे. जमीर (३९)

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT