Congress leader join NCP Sarkarnama
विदर्भ

Vidarbha's Congress Leader Join NCP : राष्ट्रवादीचा विदर्भात काँग्रेसला धक्का; वर्ध्यातील नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

NCP News : राष्ट्रवादीने काँग्रेसला विदर्भात (Vidarbha) पुन्हा एकदा धक्का दिला आहे. युवक नेत्याला पक्षात प्रवेश देत आगामी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक डगवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघ लढविण्याबाबत राष्ट्रवादी सिरियस असल्याचे दिसून येत आहे. (Congress leader from Wardha district joins NCP)

मुंबईतील राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रपूर युवक काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. डगवार यांचे सार्वजनिक जीवनातील कार्य उल्लेखनीय आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, वर्धा सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष प्रलय तेलंग उपस्थित होते.

वर्ध्यातील समुद्रपूरचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डगवार यांना गळाला लावून पक्षाने त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. युवक नेत्याला पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे, असे यातून दिसून येते. त्यामुळे आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादी ओबीसी सेलची बैठक

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या ओबीसी सेलची आढावा बैठक झाली. ओबीसी सेलच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला ओबीसी विभागाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. बूथ कमिटी आणि 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या पक्षाच्या उपक्रमांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने सहभाग घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT