Sangram Thopte News : किरीट सोमय्या वाढविणार काँग्रेस आमदार थोपटेंचे टेन्शन : भोरमध्ये येऊन दिले चॅलेंज

भोर नगरपालिकेचा कारभार आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली चालतो आहे.
kirit Somiya
kirit SomiyaSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya News : भोर नगरपालिकेच्या संबंधीत भ्रष्टाचाराच्या आणि गैरकारभाराच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्याचा पाठपुरावा मी करणार आहे, त्यामुळे भोरमधील सर्व भ्रष्टाचारावर हातोडा नक्की फिरवणार आहे, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. सोमय्या यांच्या इशाऱ्यामुळे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. (Kirit Somaiya will increase the tension of Congress MLA Sangram Thopte)

भोर (Bhor) नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे वर्चस्व राहिले आहे. थोपटे राजकारणातून बाजूला गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) नगरपालिकेवरील सत्ता कायम राखली आहे. नगरपालिकेचा कारभार आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली चालतो आहे, त्यामुळे सोमय्या (Kirit Somaiya) यांचा निशाणा नेमका कुणावर आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हेात आहे.

kirit Somiya
Money Laundering Allegation : देवेंद्र फडणवीसांचे एकदम खास अन्‌ ५०० कोटींच्या मनी लॉड्रिंगचा आरोप

भोर नगरपालिकेतील भ्रष्ट्राचार आणि गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे माझ्याकडे आल्याची माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी भोरमध्ये येऊन दिली आहे. तसेच, त्या प्रकरणाचा आपण पाठपुरावासुद्धा करणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमकी प्रकरणं काय आहेत, कोणत्या गैरव्यवहाराची आहेत, कुणाच्या काळातील आहेत, असे प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकांची चिंता वाढू शकते.

kirit Somiya
Solapur Shivsena News : दूध प्रश्नारून शिवसेना आक्रमक; ‘दूध दरवाढीचा निर्णय घेऊनच महापुजेसाठी पंढरपूरला या; अन्यथा...’

मोदी@९ या कार्यक्रमासाठी सोमय्या हे भोरमध्ये आले होते. त्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भोर नगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले. तसेच, हा कार्यक्रम जरी भोरला असला तरी आमचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

kirit Somiya
Mahim Controversial Banner: ठाकरे-आंबेडकरांच्या बॅनरवर औरंगजेबाचा फोटो; माहीममध्ये बॅनर लागल्याने खळबळ

रवींद्र वायकर, सुजित पाटकर प्रकरणांचा पाठपुरावा करणार

कोरोना काळात खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल प्रा लि कंपनीला ब्लॅकलिस्ट केले असतानाही पोलिसांनी ‘पीएमआरडीए’च्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही. यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे. ईडी आणि प्राप्तीकर विभागाने त्यांच्या बाजूने कारवाई सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा हॉटेल घोटाळा केला आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाने तात्पुरत्या स्वरुपात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याकडेही मी लक्ष देणार आहे, असेही सोमय्या यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com