Money Laundering Allegation : देवेंद्र फडणवीसांचे एकदम खास अन्‌ ५०० कोटींच्या मनी लॉड्रिंगचा आरोप

भ्रष्टाचाऱ्यांवर तुम्हाला खरोखर कारवाई करायची असेल तर आधी स्वतःच्या घरापासून सुरूवात करा.
Devendra Fadnavis-Rahul kul-Sanjay Raut
Devendra Fadnavis-Rahul kul-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल, देवेंद्र फडणवीस यांचे अंडरगारमेंट.... एकदम खास...५०० कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. त्यांनी संपूर्ण कारखाना दुसऱ्याला चालवला दिला आहे. क्या कर रहे है फडणवीस साहब.... दुसरों के तरफ अंगुली दिखा रहे है ना. ये सब डाक्युमेंट मैंने ‘ईडी’ को भेज दिये है. मिस्टर फडणवीस आप इसके उपर बात करो, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. (Devendra Fadnavis' special and 500 crores money laundering allegation)

ईडीकडून बुधवारी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी संबंधित लोकांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्याच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गैरव्यवहाराशी संबंधी भाष्य केले होते. त्याला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

Devendra Fadnavis-Rahul kul-Sanjay Raut
Solapur Shivsena News : दूध प्रश्नारून शिवसेना आक्रमक; ‘दूध दरवाढीचा निर्णय घेऊनच महापुजेसाठी पंढरपूरला या; अन्यथा...’

ते म्हणाले की, टेरर फंडिंगचा आरोप असलेल्या झाकीर नाईक याच्या संस्थेकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला साडेचार कोटी रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. ते पैसे कसे मिळाले, का दिले, त्या मागच्या हालचाली काय हेात्या, याची चौकशी गृहविभागाने करावी. गृहमंत्री म्हणून फडणवीसांकडे माहिती नसेल, तर आम्ही ती त्यांना द्यायला तयार आहोत. ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात.

Devendra Fadnavis-Rahul kul-Sanjay Raut
Mahim Controversial Banner: ठाकरे-आंबेडकरांच्या बॅनरवर औरंगजेबाचा फोटो; माहीममध्ये बॅनर लागल्याने खळबळ

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी ५०० कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. यांसदर्भातील कागदपत्रे ईडीकडे पोचली आहेत, त्याची पोचपावती माझ्याकडे आहे. दादा भुसे यांचे १७८ कोटी रुपयांचे मनी लॉड्रिंग प्रकरण आहे. त्याची सर्व कागदत्रे ईडीकडे पोचलेली आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ७५० कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंगची कागदपत्रे ईडीकडे जातील. या सर्वांवर कारवाई करावी, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली.

Devendra Fadnavis-Rahul kul-Sanjay Raut
Solapur Politics : ॲक्टिव्ह कोठे अन्‌ अस्वस्थ काडादी सोलापूर भाजपच्या गडाला लावणार सुरुंग

फडणवीस यांची या सर्वांवर बोलण्याची हिम्मत आहे का. ते फक्त विरोधकांवर बोलतात. भ्रष्टाचाऱ्यांवर तुम्हाला खरोखर कारवाई करायची असेल तर आधी स्वतःच्या घरापासून सुरूवात करा. तुमच्यावर संघाचे आणि अटलजींचे संस्कार असतील, तर तुमच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री आणि त्यांची पोरीटोरं जे खरी लाभार्थी आहेत, या कोविड घोटाळ्याचे (जर झाला असेल तर). तुमच्याकडेच बसले आहेत, ते. ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोविड सेंटरमधून मुख्यमंत्र्यांच्या घरातील लोक कमिशन घेत होते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com