uddhav thackeray Sunil Kedar  sarkarnama
विदर्भ

Ramtek Assembly Election : केदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली; भास्कर जाधवांनी डागली तोफ

Political News : रामटेक विधानसभा आणि नागपूर शहरातील दक्षिण नागपूर विधानसा मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र, दक्षिण नागपूर काँग्रेसने सोडण्यास नकार दिल्याने उद्धव सेनेने एक पाऊल मागे घेतले.

Sachin Waghmare

Nagpur News : रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोरीने उद्धव ठाकरे सेना चांगलीच संतापली आहे. माजी मंत्री सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना बंडखोरी करायला लावल्याचा थेट आरोप उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी केला.

केदारांनी पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पुतळ्यामोर एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. ती मोडली असल्याने त्यांना आता जनता माफ करणार नाही, असेही त्यांनी सुनावले. हे बघता आता रामटेकमध्ये महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रामटेकमध्ये महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray ) गटाचे विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत महायुतीचे (शिंदे सेना) उमेदवार आशिष जयस्वाल यांच्यासोबत होणार होती. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसचे (Congress ) जिल्हाध्यक्ष, माजी राज्यामंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. आधीपासूनच मुळक व काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला होता.

हा मतदार संघ सोडला असता तर उद्धव सेनेसाठी एकही मतदारसंघ शिल्लक राहिला नसता. रामटेक लोकसभा मतदारसंघ उद्धव सेनेने काँग्रेससाठी सोडला होता. त्या बदल्यात रामटेक विधानसभा आणि नागपूर शहरातील दक्षिण नागपूर विधानसा मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र, दक्षिण नागपूर काँग्रेसने सोडण्यास नकार दिल्याने उद्धव सेनेने एक पाऊल मागे घेतले. रामटेक मात्र सोडण्यास ठाम नकार दिला. काँग्रेसच्या बंडखोरीमुळे शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

उद्धव सेनेच्या उमेदवार विशाल बरबटे यांच्या प्रचारसभेसाठी भास्कर जाधव रामटेकला आले होते. यावेळी त्यांनी थेट सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, लोकसभेच्यावेळी आम्ही आमचा हक्काचा मतदारसंघ काँग्रेसला सोपवला. श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणण्यासाठी रक्ताचे पाणी केले. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्यासोबतच दगाबाजी केली. तुम्ही शब्द फिरवला, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी केदारांना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT