काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर सोशल मीडियात एडीटेड व्हिडिओद्वारे ट्रोलिंग सुरू आहे.
विजय वडेट्टीवार यांनी "केदारांसारखे दहा नेते हवेत" असे म्हटले होते, पण त्याचा गैरवापर होत आहे.
सहकारी बँक घोटाळ्याशी नाव जोडून नागपूरमध्ये रिल व्हायरल झाल्याने काँग्रेसमध्येच वाद सुरू झाला आहे.
Nagpur News : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सध्या चांगलचे ट्रोल केले जात आहे. विजय वडेट्टीवारांनी केदारांसारखे काँग्रेसला दहा नेत्यांची गरज असल्याचे सांगितले होते. याच भाषणाचा व्हिडीओ एडीट करून केदारांवर पक्षांतर्गत विरोधकांमार्फत हल्लाबोल केला जात आहे. केदारांसारखे नेते हवे या वडेट्टीवारांच्या वक्तव्याला जोडून सहकारी बँक लुटण्यासाठी का? शेतकऱ्यांचे पैसे खाण्यासाठी का? अशी विचारणा करणारी रिल सध्या नागपूर जिल्ह्यात चांगलीच चर्चेत आहे.
विशेष म्हणजे नागपूर जिल्हा सहकारी बँकेत दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात न्यायालयाने केदारांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. एवढेच नव्हे तर त्यांना विधानसभेची निवडणूक लढता आली नाही. आता केदार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी आपले वजन वापरून नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांची विकेट घेतली. त्यांच्याऐवजी आपल्या कट्टर समर्थकाला जिल्हाध्यक्ष नेमले.
एवढेच नव्हे तर प्रदेश सचिव असलेले मुजीब पठाण यांचाही प्रदेश कार्यकारिणीतून पत्ता कट केला. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात केदारांविरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे केदारांचे समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आता जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आहे. ग्रामीणमध्ये केदारांशिवाय तिकीट मिळणार नाही असे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्याशी उघडपणे कोणी पंगा घेण्यास तयार नाही. काँग्रेसच्यावतीने व्होटचोर गद्दी छोड आंदोलन झेडले आहे. ज्यात केदारांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विजय वडेट्टीवार यांना बोलावण्यात आले होते.
त्यांनी आपल्या शैलीत जोरदार भाषण दिले. भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी केदार यांच्यासारख्या दहा नेत्यांनी गरज असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे केदारांच्या सांगण्यावरून डच्चू मिळालेले माजी प्रदेश सचिव मुजीब पठाण यांनीसुद्धा आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
यात माजी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांचाही समावेश होता. हे बघता केदार समर्थक आणि केदार विरोधी गट सध्या जिल्ह्यात सक्रिय झाला असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या तोंडावर ही गटबाजी काँग्रेसला महागात पडू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत केदारांच्या पत्नी पराभूत झाल्या. केदारांच्या सांगण्यावरून माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली होती. तेसुद्धा पराभूत झाले आहेत. हिंगणा विधानसभा मतदारसंघात रमेश बंग यांनाही केदारांनी विरोध केला होता. त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी दबाव निर्माण केला होता. बंग यांचाही विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.
1. सुनील केदार का ट्रोल होत आहेत?
विजय वडेट्टीवारांच्या भाषणाचा एडीटेड व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे.
2. वडेट्टीवारांनी काय वक्तव्य केले होते?
"केदारांसारखे काँग्रेसला दहा नेते हवेत" असे.
3. व्हायरल रिलमध्ये काय दाखवले जात आहे?
केदारांवर सहकारी बँक घोटाळा आणि शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याचा आरोप सूचित केला जात आहे.
4. हा वाद कुठे गाजत आहे?
नागपूर जिल्ह्यात.
5. काँग्रेसमध्ये या प्रकरणामुळे काय स्थिती आहे?
पक्षांतर्गत संघर्ष उफाळला आहे आणि केदारांवर हल्लाबोल सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.