Amravati Congress politics : बच्चू कडूंचा शिलेदार वर्षात दुसऱ्यांदा फुटला; पटेल पिता-पुत्राने काँग्रेसचा 'हात' धरला

Rajkumar Patel Joins Congress in Amravati With Harshwardhan Sapkal, Yashomati Thakur & Balwant Wankhade : अमरावतीमधील मेळाघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहार संघटना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
Amravati Congress politics
Amravati Congress politicsSarkarnama
Published on
Updated on

Amravati political news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. राजकारणात आपलं वर्चस्व कायम राहावं, यासाठी सोयीच्या राजकारणावर राजकीय पदाधिकारी भर देताना दिसत आहे. यातून सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते देखील एकमेकांना राजकीय धक्के देताना दिसत आहे.

सत्ताधारी महायुतीमधील सर्वच राजकीय मित्रपक्ष विरोधकांना देत असतानाच, त्याचा गाजावाजा करताना दिसत असताना महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये इनकंमिग होताना दिसत आहे. काँग्रेसने विदर्भात राजकीय फिल्डिंग लावताना, पहिला प्रहार बच्चू कडूंवर केला आहे. 'प्रहार'चे माजी आमदार राजकुमार पेटल यांनी पुत्र रोहित यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री यशोमती ठाकुर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर माजी आमदार पटेल यांनी प्रहार सोडत, काँग्रेसचा हात धरल्याने, हा बच्चू कडूंना मोठा धक्का मानला जात आहे.

माजी आमदार राजकुमार पटेल यांचा राजकीय प्रवास विविध पक्षातून झाला आहे. राजकुमार पटेल यांनी आतापर्यंत 7 वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, यात 3 वेळा मेळघाट मधून आमदार राहिले आहे. यात त्यांचा चार वेळा पराभव झाला आहे. बसपा, भाजप (BJP), राष्ट्रवादी, प्रहार संघटनेनंतर आता काँग्रेसमध्ये राजकुमार पटेल यांनी पक्ष प्रवेश केला आहे. राजुकमार पटेल यांनी विधानसभेच्या तोंडावर प्रहार सोडली होती. परंतु बच्चू कडू यांनी पुन्हा प्रहारमध्ये घेत विधानसभेची उमेदवारी दिली होती.

Amravati Congress politics
Ashutosh Kale NCP controversy : आंदोलकांची शेरेबाजी, अजितदादाच्या शिलेदाराच्या जिव्हारी; 'तीन हजार कोटी, रस्त्यावर बोटी', 'आमदार काळे, रस्त्यावर तळे'

माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या या पक्ष प्रवेशामुळे अमरावतीसह मेळघाटासह काँग्रेसला बळकटी मिळणार आहे. राजकुमार पटेल यांचे चिरंजीव रोहित मेळघाटात युवकांमध्ये चांगलेच सक्रिय आहेत. त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस मिळेल, असा अंदाज बांधला जात आहे.

Amravati Congress politics
Narendra Modi : प्रत्येक मंत्र्याच्या फोनमध्ये 'तो' एक नंबर असायलाच हवा... गुजरातमध्ये मोदींनी केली होती सक्ती

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पक्षांतर करणारे राजकुमार पटेल पहिले राजकीय व्यक्तिमत्व आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहारकडून निवडणूक लढवली होती. भाजपचे केवलराम काळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात सक्रिय राहताना राजकुमार पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. परंतु आगामी राजकारणाची दिशा ओळखून पटेल पिता-पुत्रांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com