Congress Politics : राहुल गांधींचा ईव्हीएमवर हल्लाबोल! कर्नाटकमध्ये सरकारचा धक्कादायक निर्णय; सिद्धरामय्यांनी मोठा बॉम्बच टाकला!

Panchayat and local body elections will be held on ballot paper : देशभरात सध्या मत चोरीवरून रणकंदन सुरु असून काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रातील भाजप सरकारसह केंद्रीय निवडणूक आयोगावर तुटून पडले आहेत.
DK Shivakumar, Siddaramaiah
DK Shivakumar, SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. राहुल गांधींनी ईव्हीएमवरून भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप केले.

  2. त्यांनी बंगळुरू सेंट्रल जिंकल्याचे भाजपचे पुरावे सादर केले.

  3. यानंतर कर्नाटक सरकारने धाडसी निर्णय घेत ईव्हीएम बंद करण्याची घोषणा केली.

  4. पंचायत आणि नागरी निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर केला जाणार आहे.

  5. या निर्णयामुळे कर्नाटकात प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे.

Bangaluru : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या मत चोरीवरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी बिहार राज्यात रॅली काढत भाजपवर आरोप केले होते. तसेच पत्रकार परिषद घेत बंगळुरू सेंट्रलची जागा भाजपने जिंकल्याचे पुरावे सादर करत बॉम्ब फोडला होता. तर आगामी काळात हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा केली आहे. यादरम्यान आता कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आगामी पंचायत आणि नागरी निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी आगामी होणाऱ्या स्थानिकच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होणार नाही अशी घोषणा करताना मतपत्रिकांचा वापर केला जाईल असे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी बऱ्याच काळापासून निवडणुका, निवडणूक व्यवस्था, निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. याची सुरूवातच ईव्हीएमविरोधात झाली असून व्हीव्हीपीएटीवरूनही त्यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. तसेच मतदार यादीतील घोळही समोर आणला. त्यानंतर त्यांनी आता फक्त अनुबॉम्ब पडला आहे. पण यापेक्षा मोठा असणारा हायड्रोडन बॉम्ब येत आहे, तयार रहा असा इशाराच भाजपसह निवडणूक आयोगाला दिला आहे. सध्या देशभर याची चर्चा सुरू आहे.

DK Shivakumar, Siddaramaiah
Congress Politics : विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांचं ठरलं; लवकरच होणार नव्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची घोषणा

याचदरम्यान कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिकच्या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकां वापर केला जाईल. आता ईव्हीएमने नव्हे तर मतपत्रिकेने निवडणुका होतील अशी घोषणाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केली आहे.

याबाबत आता कर्नाटक सरकारने राज्य निवडणूक आयोगाला शिफारस केली असून तसा प्रस्तावातही मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचे म्हटले आहे. यावेळी सरकारने पाठवलेल्या प्रस्तावात, ईव्हीएमवर जनतेचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे. जर निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या गेल्या तर निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढेल. मंत्रिमंडळाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यास सांगितले आहे. मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठी पुढील 15 दिवसांत नियम आणि आवश्यक कायदेशीर बदल केले जातील. पण जर ईव्हीएमद्वारे निवडणुका घ्याव्याच लागतील असे कोणत्याही नियमात असेल तर तो नियम बदलला जाईल.

देशभरात सध्या काँग्रेसने मत चोरीच्या मुद्यावरून रान उठवले असून निवडणूक आयोग आणि भाजपविरुद्ध तीव्र युद्ध छेडले आहे. या युद्धात काँग्रेस नेते राहुल गांधी अग्रभागी असून त्यांनी आता लढाई तीव्र केल्याचे दिसत आहे. तर कर्नाटक सरकारने मतपत्रिकेद्वारे निवडणुकांचा मास्टरस्ट्रोक खेळत राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगाविरुद्ध मोहिमेला बळकटी देण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

भाजपचा संताप...

कर्नाटक सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपने यावर संताप व्यक्त केला आहे. मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याविरुद्ध भाजप असून प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी निशाना साधला आहे. त्यांनी, काँग्रेसचा मतांची चोरी करण्याचा आणि मतपत्रिकेचा वापर करून निवडणूक गैरप्रकार करण्याचा इतिहास असल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधींनीही तेच केले होते. आता जर काँग्रेस सरकार मतपत्रिकेद्वारे निवडणुकांकडे वाटचाल करण्याचा विचार करत असेल तर काँग्रेस जगाचा अपमान करत आहे. कारण संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या दिशेने पुढे जात आहे, मात्र काँग्रेस मागे जाण्यात धन्यता मानत आहे.

DK Shivakumar, Siddaramaiah
Congress Politics: मोठी बातमी: महाविकास आघाडीला पहिला धक्का; काँग्रेस लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

FAQs :

प्रश्न 1: राहुल गांधींनी भाजपवर कोणते आरोप केले?
➡️ त्यांनी मत चोरी आणि ईव्हीएम हेराफेरीचे आरोप केले.

प्रश्न 2: कर्नाटक सरकारने कोणता निर्णय घेतला?
➡️ आगामी पंचायत आणि नागरी निवडणुकांत ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत?
➡️ मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार.

प्रश्न 4: या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया कशी आहे?
➡️ काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले, तर भाजपने टीका केली.

प्रश्न 5: राहुल गांधींनी पुढे काय संकेत दिले?
➡️ त्यांनी ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार असल्याचे सांगून मोठा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com