Chandrapur Municipal Corporation; Vijay Wadettiwar, sudhir mungantiwar sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : चंद्रपूर महापालिकेत सत्तासंघर्ष, भाजपच्या ऑपरेशन लोटसमधून नगरसेवकांना कोट्यवधींची बोली! वडेट्टीवारांचा धक्कादायक दावा

BJP Vs Congress In Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे २७ तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले असून येथे दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

Rajesh Charpe

  1. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडे बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

  2. नगरसेवकांना एक कोटी रुपये रोख आणि पद देण्याची ऑफर दिल्याचा आरोप असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

  3. या आरोपांमुळे चंद्रपूर महापालिकेतील राजकीय वातावरण तापले असून सत्ता स्थापनेची लढाई अधिक तीव्र झाली आहे.

Chandrapur Municipal Corporation Election Update : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाकडे बहुमताचा आकडा नाही. दोन्ही पक्षातर्फे सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. मात्र त्यासाठी दोघांनाही जोडतोड करावी लागणार आहे. त्याकरिता मोठ मोठी आमिष दिली जात आहे. काही नगरसेवकांनी एक कोटी रुपये रोख आणि पद देण्याची ऑफर देण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपच्या या ऑपरेशन लोटसला काँग्रेसचे नेत विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा यास दुजोरा दिला.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे २७ तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. ६६ सदस्यांच्या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला सहा तर १० नगरसेवकांची गरज आहे. उद्धव सेनेकडे सहा, वंचितकडे दोन, बसप व एमआयएमकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. याशिवाय काँग्रेसचे दोन बंडखोर निवडून आले असून जनविकास सेनेकडे तीन नगरसेवक आहेत.

हे बघता काँग्रेस आणि भाजपकडून उरलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे दोन बंडखोर नगरसेवक वडेट्टीवार यांचे समर्थक आहेत. खासदार धानोरकर यांनी त्यांचे तिकीट कापल्याचा आरोप आहे. त्यांनी महापौरपदाचा उमेदवार बघून कोणाला समर्थन द्यायचे ठरवले आहे. एक प्रकारे त्यांनी खासदार धानोरकरांच्या उमेदवाराला समर्थन देणार नाही असाच इशारा दिला असल्याचे बोलले जाते.

तर उद्धव ठाकरे आणि वंचितने आठ जणांचा गट स्थापन केला आहे. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली आहे. काँग्रेसमधील भांडणे आणि गटबाजीमुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनी ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. नाराजांना आपल्याकडे वळवण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. सध्या एका कोटी रुपये आणि पद असा रेट भाजपने ठरवला आहे.

यावर वडेट्टीवार म्हणाले, त्यांनी आमच्याही काही नगरसेवकांना ऑफर दिली आहे. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ते कोणालाही खरेदी करू शकतात. पैशाची जादू काय खेळ करते हे आत्ताच सांगता येणार नाही. आमचे नगरसेवक आमिषाला बळी पडले नाही तर काँग्रेसची सत्ता स्थापन होऊ शकते असे सांगून वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये काहीही होऊ शकते असा इशाराच अप्रत्यक्षपणे दिला.

FAQs :

1) चंद्रपूर महापालिकेत बहुमत कोणाकडे आहे?
👉 सध्या काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत नाही.

2) नगरसेवकांना काय ऑफर दिल्याचा आरोप आहे?
👉 काही नगरसेवकांना एक कोटी रुपये रोख आणि पद देण्याची ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

3) या आरोपांना कोणी दुजोरा दिला?
👉 काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या आरोपांना दुजोरा दिला आहे.

4) या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 या आरोपांमुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

5) पुढे काय होऊ शकते?
👉 सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना आघाडी किंवा अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT