Shyamkumar Barve News : ग्रामपंचायात ते थेट संसद असा प्रवास करणारे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे दिल्लीत गेल्यावर काय बोलणार? त्यांना काय समजणार? असे प्रश्न विरोधक उपस्थित करत होते.
मात्र, पहिल्यांदाच दिल्ली गाठणाऱ्या बर्वे यांनी थेट रेल्वे मंत्रालयाच्या कारभारवर बोट ठेवून अर्थसंकल्पातील केलेली तरतूद आणि प्रत्यक्ष गरज याची तफावत लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सरकारला जाब विचारून धारेवर धरले.
श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ते लोकसभेचे उमेदवार झाले. बर्वे लोकसभेत काय प्रश्न विचारणार, असे म्हणत प्रचारात विरोधकांकडून त्यांची खिल्ली उठवली होती. मात्र, बर्वे यांनी सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर खासदार श्यामकुमार बर्वे यांना प्रथमच संसदेत बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी करोनाच्या काळात रामटेक मतदारसंघातून धावणाऱ्या बंद पडलेल्या रेल्वे गाड्या आणि रेल्वे थांब्यांचा विषय त्यांनी मांडला.
दक्षिण एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, जबलपूर एक्सप्रेस, दानापूर एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्यांचे नरखेड रेल्वे स्थानकावरचे थांबे बंद करण्यात आले होते. ते अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60 ते 70 किमी प्रवास करून शाळा-कॉलेजमध्ये जावे लागते. त्यांची गैरसोय होत आहे.
आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने या गाड्यांना पुन्हा नरखेड येथे थांबा देण्याची मागणी बर्वे Shyamkumar Barve यांनी केली.
रेल्वेमध्ये वृद्धांसाठी कमी झालेला कोटा पुन्हा सुरू करावा आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा काळातील प्रवासादरम्यान मिळणारी सवलत पुन्हा देण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात सध्या 41 रेल्वे प्रकल्प स्वीकृत आहेत. 81 हजार 580 कोटींची गरज आहे. मात्र, अर्थसंकल्पात फक्त 15 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सोबतच आधुनिकीकरणाच्या नावाखाली भाजपने BJP खासगी कंपन्यांना 45 वर्षांच्या लीजवर दिलेल्या जागांनाही संसदेत विरोध दर्शवला.
(Edited By Roshan More)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.