Shyamkumar Barve : नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वेंनी पहिलं पाऊल देशमुखांच्या काटोलात का ठेवलं?

Shyamkumar Barve VS Anil Deshmukh : काटोल मतदरासंघात अनिल देशमुख यांचे सुपुत्र तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य आहेत.
shyamkumar barve | anil deshmukh
shyamkumar barve | anil deshmukhsarkkarnama
Published on
Updated on

- राजेश चरपे

Nagpur News, 12 June : रामटेक लोकसभा मतदारसंघात श्यामकुमार बर्वेंनी विरुद्ध राजू पारवे अशी 'टफ' फाइट झाली. यात बर्वेंनी 76 हजारांनी राजू पारवेंचा पराभव केला आहे. निवडून येताच श्यामकुमार बर्वेंनी पहिलं काटोला-नरखेड विधानसभा मतदारसंघात टाकलं आहे.

या दौऱ्यात मतदारसंघाचे आमदार तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोबत नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काटोल-नरखेड तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीनं नुकसान झालं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्यासोबत खासदार बर्वेंनी दौरा केला. सोबत महिला व बाल कल्याण समिती सभापती अवंतिका लेकुरवाळे, कृषी सभापती प्रवीण जोध, शिक्षण समिती सभापती राजकुमार कुसुंबे, समाज कल्याण समिती सभापती मिलिंद सुटे, जि.प. सदस्या दीक्षा मुलताईकर आदी त्यांच्यासोबत होते. हे सर्व सभापती व सदस्य माजी मंत्री सुनील केदार यांचे कट्टर समर्थक आहेत.

या मतदरासंघात अनिल देशमुख यांचे सुपुत्र तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनाही दौऱ्यात सोबत घेण्यात आले नव्हते. यामुळे आणखीच शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) आणि सुनील केदार हे महाविकास आघाडीत आहेत. दोघेही सातत्याने आपआपल्या मतदारसंघातून निवडून येत आहेत. असे असले त्यांच्यात जिल्ह्यात वर्चस्वावरून सुप्त स्पर्धा सुरूच असते. जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढली होती.

shyamkumar barve | anil deshmukh
Sunil Kedar : लोकसभेनंतर सुनील केदार यांच्या समर्थकांना लागले विधानसभेचे वेध, कोणाला संधी मिळणार?

राष्ट्रवादीचे पाच जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतरही केदारांनी ( Sunil Kedar ) त्यांना एकही सभापतीपद दिले नव्हते. शेवटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोन आल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका सदस्याला सभापतीपद देण्यात आले होते. रामटेकमध्ये केदारांनी महाविकास आघाडीचा उमेदवार दिला होता. त्याला निवडूनसुद्धा आणले.

shyamkumar barve | anil deshmukh
Gadchiroli News : बंगला बांधला अन् पराभवाला समोरे जावं लागलं; 'या' मातब्बर नेत्यांबाबत असाही योगायोग

भाजप आमदारांच्या दोन विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे बर्वे यांना मोठे मताधिक्य आहे. मात्र, अनिल देशमुखांच्या मतदारसंघातून फक्त साडेपाच हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. ही बाब केदार आणि काँग्रेसला खटकत आहे. नवनिर्वाचित खासदार आणि केदारांचे कट्टर समर्थक असलेल्या श्यामकुमार बर्वे यांनी आपला पहिल्या राजकीय दौऱ्यासाठी काटोल-नरखेड निवडल्याने काहीतरी पाणी मुरत असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com