Congress vs BJP  Sarkarnama
विदर्भ

Congress vs BJP : मोदींच्या निवृत्तीवर काँग्रेसच्या सपकाळांनी भाजपला दिला रामायणाचा दाखला; म्हणाले, 'दशरथाला दाढीत पांढरा केस दिसला अन्...'

Congress state president Harshwardhan Sapkal Buldhana BJP Prime Minister Narendra Modi retirement : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सेवानिवृत्तीच्या वयावरून भाजपला खोचक टोला लगावला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी राजकीय वारसदार कोण असेल, यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या संघटनेतील राजकीय सेवानिवृत्तीचा दाखला देताना, विरोधकांनी भाजपचा खोचक सल्ले आणि टीका करण्यास सुरवात केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा दौऱ्यावर असताना, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय सेवानिवृत्तीच्या वयावरून भाजपचा खोचक टोला लगावला आहे. रामायणमधील एक प्रसंगाचा दाखला देताना दशरथाला दाढीतील पांढरा केस दिसल्यावर अयोध्येच्या कारभाराची सूत्र कोणाकडे दिली होती, याची आठवण हर्षवर्धन सपकाळ यांनी करून दिली.

काँग्रेसचे (Congress) हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "दशरथाला आपल्या दाढीत एक पांढरा केस दिसल्याने अयोध्याची सूत्र रामाकडे देण्याचं निर्णय त्यांनी घेतला". अध्यात्मिक अन् पुरातन दाखला आपला सगळ्यांसाठी असताना, उठसूठ जसे मुघलाना धनाजी-संताजी दिसायचे , तसंच भाजपच्या लोकांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी जातच दिसते. प्रत्येकात जातीचा धर्माचा उल्लेख करणे ही भाजपची नित्यनियमाची सवय होऊन गेली आहे, असा टोला देखील सपकाळ यांनी लगावला.

मनसे (MNS) मराठीच्या मुद्यावर पुन्हा आक्रमक झाली आहे. राज ठाकरे यांनी मुंबईच्या मेळाव्यात राज्यातील प्रत्येक बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का? हे तपासा, असा आदेश आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसे प्रत्येक मुद्दा शेवटपर्यंत टिकवून ठेवावा. यासाठीच त्यांना शुभेच्छा, असा टोला लगावला.

महायुती सरकारची औरंगजेबाशी तुलना

महायुती सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केले आहे. यात महायुतील मंत्री, आमदार यांच्या कारखान्यांना झुकतं माप दिलं आहे. त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी मिलो बाटो हा त्यांच्या सरकारचा एक ढाचा आहे. त्यामुळे जो सरकारमध्ये आहे, त्याला नियम तोडून-मोडून पाहिजे आणि ते दिले देखील जाते. विरोधात असेल त्यांना 'ईडी', 'सीबीआय'ची भीती दाखवून आपल्या पक्षात आणले जाते. यामुळेच मी सरकारची तुलना औरंगजेबाशी केली होती, असे म्हटले.

अध्यादेशांमध्ये गोल-माल...

महायुती सरकारच्या अधिवेशनानंतर आर्थिक वर्षाचे शेवटी 183 अध्यादेश मंजूर करण्यात आले. यावर भाष्य करताना सरकाळ यांनी या अध्यादेशांमध्ये भ्रष्टाचाराची फार मोठी शक्यता आणि तक्रारी आहेत. लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 रुपयांचा अध्यादेश निघाला असता, तर चांगले झाले असते. शेतमालाच्या अनुषंगाने काही अध्यादेश जीआर निघाले असते, तर चांगले झाले असते. मात्र महायुती सरकारला सोयीस्करपणे जन सामन्यांच्या प्रश्नाची विसर पडलेला आहे. लाडका ठेकेदार, लाडका आमदार यांची पाठराखण करण्याचा तो एक पुरावा आहे, असा घणाघात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT