Narendra Modi Retirement Age : 'मोदींना 'नव्वदी'पर्यंत पदावर ठेवावं, तो भाजपचा विषय'; संजय राऊतांच्या मतांशी वडेट्टीवारांची असहमती

Congress Vijay Wadettiwar Nagpur PM Narendra Modi political retirement age political debate : भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय निवृत्तीवर खासदार संजय राऊत यांच्या मताशी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असहमती दर्शवली.
Narendra Modi  1
Narendra Modi 1Sarkarnama
Published on
Updated on

Congress Leader on Modi Retirement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीचे वय झाले, त्यांचा वारसदार ठरला असल्याचे सांगून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे. भाजपच्यवतीने राऊतांना सडेतोड उत्तर दिले जात आहे. असे असले तरी काँग्रेस राऊतांच्या मतांशी सहमत नसल्याचे विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

ते म्हणाले, "सत्ता सर्वांना प्रिय असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वयाची 75 वर्षे झाल्यानंतरही खुर्चीवर राहण्याची सूट दिली असेल, तर तो भाजपचा पक्षांतर्गत विषय आहे. भाजपने जर मोदी यांना 90 वयाच्या वर्षांपर्यंत पदावर ठेवण्याचा निर्णय घेतला असले, तर त्यावर आमचा आक्षेप असण्याचे कारण नाही".

मोदी हे 74 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण राहील याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात झेडल्या गेली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने (BJP) 75 वर्षे पूर्ण झालेल्या अनेक नेत्यांना घरी बसवले होते. त्यामुळे भाजपने नेत्यांच्या निवृत्तीचे वय 75 असे ठरवले असल्याचे सांगण्यात येते.

Narendra Modi  1
Shivaji Kardile On Sujay Vikhe : 'सुजय विखे राज्यात नको, आमचं मंत्रिपद धोक्यात येईल'; आमदार कर्डिले मनातलं बोलून बसले!

यामुळे मोदी यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मोदी नागपूरमध्ये असताना या वादाला खतपाणी घातले. त्यांनी मोदी यांच्या वारसदार ठरल्याचाही दावा केला होता. त्यामुळे भाजपातच अस्वस्था निर्माण झाली आहे. राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपचे नेते तुटून पडले आहे. निवृत्तीचा काही नियम नाही आणि भाजपने निर्णय घेतला नसल्याचा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Narendra Modi  1
Chandrashekhar Bawankule: मोदींच्या निवृत्तीवरुन बावनकुळे राऊतांवर बरसले! म्हणाले, 'सकाळचा भोंगा...'

सोबत यापूर्वी झालेल्या पंतप्रधानांच्या वयाचे दाखलेही त्यांनी दिले आहे. मनमोहन सिंग वयाच्या 81 वर्षी पंतप्रधान होते, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे. या सर्व वादावर वडेट्टीवार यांनी परिपक्व प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्याही म्हणण्यानुसार राजकारणात निवृत्तीचे वय नसते, याचा निर्णय त्यांच्या पक्षाला घ्यायचा असतो. भाजपने ठरवले तर मोदी यांना 90 व्या वर्षीसुद्धा ते नेतेपदी ठेऊ शकतात, असे वडेट्टीवारांनी सांगितले.

उद्योजकांचे कर्ज माफ, शेतकऱ्यांचे काय?

वडेट्टीवारांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना विजेचे दर कमी होत आहे, याचा आनंद व्यक्त करतानाच यापूर्वी ते किती वाढवले होते, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगून खास आपल्या स्टाईलने सरकारला धारेवर धरले. देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी झालेली असताना बारा लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ केले आहे. मात्र शेतकऱ्यांना एक रुपयाची ही कर्जमाफी दिली नाही.

गरिबांना लुटा आणि श्रीमंताला वाटा

नवीन आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना दिलेली वचने पूर्ण करा, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबांना वाचवा. शेतकरी कर्जातून मुक्त करा, अशीच आमची मागणी आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. राज्य कर्जबाजारी झाला आहे. कर्ज काढून राज्य चालवणे हेच सरकारचे हाती आहे. याकरिता रेडीरेकनरचे दर वाढवण्यात आले आहे. टोल टॅक्सही वाढवण्या तआला. गरिबांना लुटा आणि श्रीमंताला वाटा हेच धोरण सरकारचे असल्याची टीकाही वडेट्टीवारांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com