Rahul Gandhi Congress  Sarkarnama
विदर्भ

Congress Politics : बाबा आष्टनकर यांना काँग्रेसचा 'दे धक्का', सात महिन्यातच जिल्हाध्यक्षपद घेतले काढून

Baba Ashtankar Ashwin Bais Nagpur District President : हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा आष्टनकर यांच्या नावाने पत्र काढले जात होते. असे असले तरी सुनील केदार गटाचा त्यांच्या नावाला विरोध होता.

Rajesh Charpe

Nagpur Congress : माजी जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा गटबाजीचा मोठा फटका बसला. अवघ्या सात महिन्यात त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी आश्विन बैस यांची नियुक्ती करण्यात आली. बैस हे सुनील केदारांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची नियुक्ती करून केदारांनी पुन्हा जिल्ह्यात आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.

विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान बाबा आष्टनकर यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सहा ते सात महिन्याच्या कार्यकाळात काँग्रेसच्या सर्व बैठकांना जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा आष्टनकर यांना बोलवण्यात येत होते. राहूल गांधी यांनी दिल्ली येथे बोलावलेल्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला बाबा आष्टनकर उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा आष्टनकर यांच्या नावाने पत्र काढले जात होते. असे असले तरी सुनील केदार गटाचा त्यांच्या नावाला विरोध होता. अनेक दिवसांपासून आष्टनकर विरुद्ध केदार समर्थक असे शीतयुद्ध जिल्ह्यात सुरू होते. दोघांचे समर्थक एकमेकांच्या बैठकांना जात नव्हते. परस्पर बैठका आयोजित केल्या जात होत्या. या गटबाजीचा शेवट बाबा आष्टनकर यांच्या गच्छंतीने झाला.

विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालासोडण्यात आली होती. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्याचा आग्रहास्ताव मुळक यांनी आपली उमेदवारी दाखल केली. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याऐवजी बाबा आष्टनकर यांना नागपूर जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष करण्यात आले होते.

हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मुळक तसेच बंडखोरी करणारे याज्ञवल्क्य जिचकार यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. या दोघांचाही प्रदेश कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आश्विन बैस युवक काँग्रेसपासून सक्रिय आहे. ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT