मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विधानसभा अध्यक्षपदाचा (Speaker of Legislative Assembly) उमेदवार ठरण्याआधीच काँग्रेसकडच्या (Congress) खात्यांचे मंत्री बदलले जाण्याची चिन्हे असून, त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा समावेश निश्चित मानला जात आहे.
मंत्रीमंडळात येण्यासाठी पटोलेंना आपल्या पक्षाच्या ऊर्जामंत्र्यांना 'शॉक' द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. मंत्रीमंडळातील बदलामुळेच विधानसभेच्या अध्यक्षांची निवड पुढील आठवड्याचे गणित असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, मला मंत्रीपदाची अपेक्षा नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक पुढच्या आठवड्यात होईल, असे पटोले यांनी बुधवारी (ता. 22 डिसेंबर) विधान भवनात जाहीर केले.
विधीमंडळाच्या मागील अधिवेशनातच विधाससभा निवडणूक आणि अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला, तेव्हाच पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचेही सांगण्यात आले होते. ही निवडणूक टळल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात निवडणूक घेण्याचा चंग काँग्रेसने बांधला होता. त्यानुसार गोड थोपटेंना लकवरच गोड बातमी मिळणार असल्याचे पटोलेंनी थोपटेंच्या कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर गेल्या महिनाभरात पटोलेंचे तीन दिल्ली दौरे झाल्याने विधासभेला अध्यक्ष मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच्या पटोलेंच्या दौऱ्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारही असल्याने मंत्रीमंडळातील चर्चा रंगली आहे. त्यात पक्ष विस्तार करताना पटोलेंना बळ देण्यासाठी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दुसरीकडे, मंत्रीपदासाठी पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पटोले यांचा समावेश झाल्यास राऊतांना नक्कीच 'शॉक' बसणार आहे. राऊत यांचे खाते पटोले यांच्या वाट्याला आल्यास विधानसभा अध्यक्ष म्हणून राऊतांना पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.