Yashomati Thakur  Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur News : इलेक्शन आलं की भाजपला असे धंदे सुचतात; ओबीसी यात्रेवरून यशोमती ठाकूर यांचा टोला

OBC Census : भाजप दोन समाजात भांडण लावण्याचे काम करीत आहे.

Mangesh Mahale

Amravati Political News : भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू आहे. आज (सोमवारी) ही यात्रा अमरावती येथे पोचणार आहे. यानिमित्ताने अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या यात्रेवरून भाजपला टोला लगावला आहे. "इलेक्शन आले की भाजपला असे धंदे सुचतात," अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

दोन ऑक्टोबरपासून भाजपची ओबीसी यात्रा विदर्भात सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे ही यात्रा पोचणार आहे. यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. "ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, एकहाती सत्ता असणारे केंद्र सरकार ओबीसीची जनगणना का करत नाही? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, "ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ही रास्त मागणी आहे. राहुल गांधींनीही संसदेत ही मागणी केली आहे. बिहार सरकारने ओबीसींची जनगणना केली आहे, अशीच जनगणना महाराष्ट्राने केली पाहिजे. पण निवडणुका आल्या की भाजपला असे धंदे सुचतात. भाजप दोन समाजात भांडण लावण्याचे काम करीत आहे. आरक्षणासाठी धनगर, मुस्लिम, मराठा समाजाला आंदोलन करायला लावतात. या सर्व गोंधळात राज्यातील मूळ प्रश्न मागे राहतात. भाजपलाही हेच पाहिजे आहे. भाजपचे सर्व विस्कळीत झाले आहे, त्यांना फक्त सत्ताकारण पाहिजे आहेत."

भाजपची ओबीसी यात्रा ही महाराष्ट्रात सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सुमारे ४४ विधानसभा व नऊ लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आमदार डॉ. आशिष देशमुख व ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT