मुंबई : गेल्या आठवड्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींचा उल्लेख करत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा वाद काहीसा शांत झाला असताना आता त्यांनी पुन्हा केलेल्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस तोंडघशी पडली आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त भाषण करताना नाना पटोलेंनी काँग्रेसकडून महात्मा गांधीसंदर्भात कायम आक्षेप घेतला जाणारा शब्द वापरला. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षांनीच हा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Nana Patole's Controversial statement about Gandhiji)
- काय म्हणाले नाना पटोले
“महात्मा गांधींनी अहिसेंच्या माध्यमातून भारताला तर स्वातंत्र्य मिळवून दिलं पण त्याचबरोबर जगालाही संदेश देण्याचं काम या माध्यमातून केलं. आजच्या दिवशीच नथुराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केली. नथुराम गोडसेच्या रुपाने देशाने पहिला दहशतवादी पाहिला. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला,” असं म्हटलं. मात्र काॅग्रेसनं कायमच महात्मा गांधींचा वध या शब्द प्रयोगाला कडाडून विरोध केला आहे. पण नाना पटोलेंनी ‘महात्मा गांधींचा वध’ हा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
- कॉंग्रेसची सारवासारव
मात्र नाना पटोलेंच्या वक्तव्याची जाणीव होताच कॉंग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.'बोलण्याच्या ओघात चुकून तो शब्द वापरला गेला असावा, असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सारवासारव केली आहे. मात्र याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजपचे नेते दुतोंडी आहेत.
नरेंद्र मोदी ‘बेटी पढाओ बेटी पटाओ ’म्हणाले तेव्हा बोलताना जीभ घसरली असे भाजपवाले म्हणतात, आणि नानांच्या तोंडातून हत्येऐवजी वध असा एक शब्द चुकून गेला तर भाजपवाले त्यांच्या मनात तेच आहे, असे म्हणतात, मग मोदींच्या मनातही बेटी पटाओ हेच होते का? असा सवालही लोंढे यांनी केला.
नथुराम गोडसे दहशतवादी होता आणि त्याने राष्ट्रपित्याचा खून केला. गोडसे मुर्दाबाद, हे पटोले एकदा नाही तर हजार वेळा म्हणतील. पण भाजपाचे किती नेते गोडसे मुर्दाबाद म्हणू शकतात का, असा सवालही अतूल लोंढेनी केला.
- कॉंग्रेसमधूनही टीकेचा सूर
नाना पटोले आणि पंजाबमधील नवज्योतसिंह सिद्धू हे दोन नेते यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यामुळे त्यांच्यात अजिबात फरक नाही. नाना पटोलेंनी गांधी वध असा उल्लेख करून त्यांच्यातील भाजपचे पाणी अद्यापही कायम असल्याचे दाखवून दिले आहे. अशी खोचक टीका काँग्रेस पक्षातून केली जात आहे. तसेच. सतत वादग्रस्त वक्तव्ये करून पटोले पक्षाचे नुकसान करत असल्याची भावना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.