भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी दुसऱ्या पत्नीनं सोडलं मौन

भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने तिघांना प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
Bhaiyyu Maharaj Suicide Case
Bhaiyyu Maharaj Suicide Case Sarkarnama
Published on
Updated on

इंदोर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने त्यांचे मुख्य सेवादार विनायक दुधाळे (Vinayak Dudhale), चालक शरद देशमुख (Sharad Deshmukh) आणि शिष्या पलक पुराणिक (Palak Puranik) या तिघांना प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी त्यांच्या दुसऱ्या पत्नीने मौन सोडल आहे. दोषींना सुनावलेली शिक्षा ही अतिशय कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Bhaiyyu Maharaj Suicide Case)

भय्यू महाराजांची दुसरी पत्नी असलेल्या डॉ.आयुषी शर्मा म्हणाल्या की, मी न्यायालयाच्या निकालाच्या आदर करते. दोषींना मिळालेली शिक्षा ही अतिशय कमी आहे. त्यांनी आम्हाला आयुष्यभराची शिक्षा सुनावली आहे. मी अद्याप न्यायालयाचा आदेश पाहिलेला नाही. न्यायालयाच्या आदेश हाती येताच कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी बोलून मी पुढील कायदेशीर लढाई लढण्याबाबत निर्णय घेईन. (Bhaiyyu Maharaj News)

Bhaiyyu Maharaj Suicide Case
भय्यू महाराजांना मनोरुग्ण बनवण्याचा होता कट; पलकने मांत्रिकाला दिली होती सुपारी

भय्यू महाराज यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत 12 जून 2018 रोजी आत्महत्या केली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर सहाच महिन्यांत पलकसह तिघांना अटक करण्यात आली होती. तिघांना जानेवारी 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका पलकसह तिघांवर ठेवण्यात आला होता. आरोपींकडून त्यांना पैशांसाठी धमकावले जात होते, असेही न्यायालयात सिध्द झाले. त्यामुळे आयपीसी कलम 306 नुसार तिघांना दोषी धरत प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. (Bhaiyyu Maharaj Suicide Case Updates)

Bhaiyyu Maharaj Suicide Case
डिसले गुरुजी पुन्हा अडचणीत! 'डाएट'च्या प्राचार्यांनी आणलं सत्य समोर

या प्रकरणात न्यायालयात 32 साक्षीदार सादर करण्यात आले. इंदोर येथील सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. विनायक दुधाळेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी भय्यूजींनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवली होती. संपत्ती नावावर केली नव्हती. त्यामुळे विनायकला फसवण्यात आले, असा दावा वकिलांनी केला. घटनेच्या काही दिवस आधी पुण्याला जात असताना भय्यूजींना सतत कुणाचे तरी फोन येत होते. पण त्याची चौकशी करण्यात आली नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केली.

तिघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. तिघे मिळून भय्यू महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत होते. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेख केला होता. आत्महत्येनंतर त्यांचे मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वादही समोर आला होता. पण त्यानंतर झालेल्या तपासात या तिघांची नावे समोर आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com