Cricketnama 2023 Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : 'क्रिकेटनामा'च्या अंतिम सामन्यांसाठी मैदान खचाखच भरले; टाळ्या, शिट्ट्या अन् पिपाण्यांचा आवाज घुमला

Deepak Kulkarni

Nagpur पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी :

नागपूर हिवाळी अधिवेशनामुळे तापलेले राजकीय वातावरण... सरकारनामा आयोजित 'क्रिकेटनामा'च्या कार्यक्रम... थंडीत मैदानावर मंत्री, आमदार, त्यांच्या कार्यकर्त्यांची छापमध्ये एन्ट्री... जर्सी घालून मैदानात उतरताच सुरू झालेले डावपेच... मैदानाभोवती पोलिसांचा दक्ष पहारा... सरकारनामाच्या टीमने मैदानात तंत्रज्ञानापासून केलेले उत्कष्ट नियोजन...यामुळे मैदानात खेळाचा चढलेल्या रंगात आमदार आणि त्यांचे पदाधिकारी सुखावल्याचे चित्र होते.

अधिवेशनाच्या या काळातच 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'कडून श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंडवरील पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे 'क्रिकेटनामा'ची आज दुसऱ्या दिवशी सांगता होत आहे. क्रिकेटनामासाठी भाजप (BJP) , काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे, नागपूर सरपंच संघ मैदानात होते.

या संघांमध्ये मैदानात घमासान झाली. जिंकण्यासाठी मैदानात उतरताच डावपेच टाकले जात होते. 'सरकारनामा'ने या मैदानात तंत्रज्ञानाचा पुरेपर वापर करत सज्ज केले होते. त्यामुळे मैदानावर खेळताना आमदार आणि त्यांचा संघ इंटरनॅशनल आणि टी-२० क्रिकेट खेळ अनुभवत होते. तसे बोलवून दाखवत होते.

सरकारनामा आयोजित 'क्रिकेटनामा'चे (Cricketnama 2023) अंतिम सामने असल्याने मैदानावर जल्लोष होता. हे सामने पाहण्यासाठी नागपूरमधील क्रिकेटप्रेमींनी मैदानात हजेरी लावली होती. अंतिम सामन्यासाठी प्रेक्षक उत्साही होते. खेळाडूंचा उत्साह वाढण्यासाठी टाळ्या, शिट्या, पिपाण्या वाजवून दाद दिली जात होते. क्षेत्ररक्षण, फलंदाजी, टोलेबाजी, झेल, स्टपिंग, धावबाद, षटकार, चौकार अशा शब्दांनी समालोचनाचा आवाज मैदानात सतत घुमत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नियमित क्रिकेटचा सराव करणारे मुल-मुली देखील प्रेक्षक गॅलरीत बसून समाने पाहण्याचा आनंद लुटत होती. फलंदाजी आणि गोलंदाजी कशी करावी, याबाबत ती मुले बाहेरून ओरडून सांगत होती. या मुलांबरोबर त्यांची क्रिकेट कीट देखील होती. त्यातून बॅट काढून खुणवत होती. त्यामुळे मैदानावर वेगळाच रंग भरला होता.

'सरकारनामा'च्या सोशल मीडिया पेजवर क्रिकेटनामा लाईव्ह होता. देश, महाराष्ट्र आणि परदेशातील राजकीय नेते, पदाधिकारी, अधिकारी आणि क्रिकेटप्रेमी या पेजला फाॅलो करत होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत होते.

शरद पवारांचा वाढदिवस साजरा...

राष्ट्रीय नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दोन्ही गट, काॅंग्रेससह सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत केक कटींग केले. माजी मंत्री बाबा सिद्धीकी यावेळी उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT