Jaykumar Gore, Shivendraraje Bhosale Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : शिवेंद्रराजे, जयकुमार गोरेंच्या बॅटिंगवर फडणवीसांचा विश्वास; सातारचे खेळाडू नागपूर गाजवणार

Shivendraraje Bhosale, Jaykumar Gore : क्रिकेटनामा चषकावर नाव कोरण्यास राजकीय टीम सज्ज

उमेश बांबरे .

Nagpur Cricketnama News : 'सरकारनामा'च्या क्रिकेटनामा स्पर्धेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची तगडी टीम क्रिकेटनामा चषक पटकविण्यास सज्ज झाली आहे. या टीममध्ये सातारा जिल्ह्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे या धडाकेबाज फलंदाजांचा समावेश आहे. हे दोघे नागपूरच्या मैदानावर चौकार, षटकारातून सातारचे नाव गाजवण्यास तयार आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण थंडीतही तापले आहे. नागपूर अधिवेशनाच्या या काळातच 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'कडून सोमवारीपासून नागपूरमधील श्यालेम स्पोर्ट्स ग्राऊंडवरील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे 'क्रिकेटनामा' रंगणार आहे.

या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाया मंत्री सुधीर मुनगंटीवार स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हे निमंत्रक आहेत.

यात भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार पक्षाने आपले संघ मैदानात उतरवले आहेत. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 'क्रिकेटनामा'च्या मैदानात 'एन्ट्री' घेतली आहे.

या स्पर्धेत सर्वाधिक लक्ष आहे ते राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या टीमकडे लागले आहे. या टीममध्ये अनेक दिग्गज फलंदाज असून सातारा जिल्ह्यातील सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे या दोघांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शांत संयमी असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी तब्बल तीन मतदारसंघात आपली टाकत निर्माण केली आहे. तसेच सहकार क्षेत्रात ही दोन साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस शेतकऱ्यांना आपलेसे केले आहे. सभागृहात ही ते आपल्या मतदारसंघातील प्रश्न धडाडीने मांडून विविध विकास कामांना मोठ्याप्रमाणात निधी मंजूर करून आणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वाधिक जवळ असलेले नेतृत्व असल्याने ते या क्रिकेटनामा सामन्यात धडाकेबाज बॅटिंग करताना चौकार षटकारांचा पाऊस पडणार आहेत.

माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील राजकीय पटलावर विरोधकांना धडकी भरवतात. त्यांनी माणचा पाणीप्रश्न सोडवून विविध योजनांचे पाणी खटाव, माणच्या जनतेला उपलब्ध केले आहे. असे आमदार जयकुमार गोरे क्रिकेटनामाच्या मैदानावर जोरदार टोलेबाजी करून धावांचा आलेख उंच करणार आहेत. त्यामुळे सातारचे हे दोन फलंदाज नागपूरचे मैदान वाजवणार आहेत. आता हे दोघे किती धावांचा डोंगर रचणार याची सातारकरासह नागपूर करांना ही उत्सुकता लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT