INDIA Alliance : इंडिया आघाडीचं ठरलं; आता याच महिन्यात दिल्लीत होणार बैठक...

Congress, TMC, NCP : लोकभसेच्या जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता
INDIA Alliance
INDIA AllianceSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसडमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याचे परिणाम इंडिया आघाडीत उमटले. काँग्रेसवर काही घटक पक्षांची सडकून टीका केली. परिणामी आघाडीची ६ डिसेंबर रोजी होणारी बैठक रद्द करण्यात आली. याचा फायदा घेत भाजपनेही आघाडीची खिल्ली उडवली. दरम्यान, आता इंडिया आघाडीची पुढील बैठक ठरली आहे. ती याच महिन्यात १९ तारखेला दिल्ली येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या बैठकीत काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी काळातील निवडणुका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच घटक पक्षांसाठी किमान समान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपाचबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. पटना, बंगळुरू, मुंबईनंतर दिल्लीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या चौथ्या बैठकीकडे महायुतीसह देशाचे लक्ष आहे.

INDIA Alliance
Madhya Pradesh New CM : नवा चेहरा की शिवराजच ? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याबाबत आज होणार फैसला!

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे आघाडीतील इतर पक्षांची कोंडी झाली होती. 6 डिसेंबर रोजी आघाडीची बैठक बोलावल्याचे पक्षाने कळवले होते. मात्र आघाडीतील अनेक पक्षांच्या बहुतेक नेत्यांनी विविध कारणे सांगून बैठकीला येण्यास असर्थता दर्शवली होती. यात लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामुळेही ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता होता. मात्र इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांची बैठक १९ डिसेंबरला होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीतील बहुतेक आघाडीचे पक्ष, विशेषत: तृणमूल काँग्रेस, आप आणि जदयू विधानसभा निवडणुकीचा हवाला देऊन, जागा वाटपावरून काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांची काँग्रेसच्या निर्णयामुळे पहिल्या तीन बैठकांमुळे देशात निर्माण झालेल्या वातावरणावर परिणाम झाल्याची तक्रार आहे. इंडिया आघाडीत देशभरातील २६ पक्षांचा समावेश आहे.

(Edited by Sunil Dhumal)

INDIA Alliance
Maratha Reservation : ''मी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com