Sarpanch Team Vs NCP Sarakarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : राष्ट्रवादीच्या संघाला आठ गडी राखून पराभूत करत, सरपंच संघाने मारली बाजी!

Sarpanch Team Wins against NCP : सरपंच टीमचे तौसिफ खान सामनावीराचा पुरस्काराचे मानकरी ठरले.

Mayur Ratnaparkhe, प्रसन्न जकाते

NCP AP Lions Vs Sarpanch Titans : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : अखेरच्या क्षणापर्यंत चालेल्या चूरशीनंतर सरपंच संघाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संघावर विजय मिळविला. विजयासाठी दोन चेंडूत दोन धावा गरजेच्या असताना विजयी षटकार मारत सरपंच संघाच्या फलंदाजांनी सामना जिंकला. ‘सरकारनामा’चे विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहेरे यांनी केलेली नाणेफेक सरपंच टीमने जिंकली. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 11) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा दुसरा सामना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (Ajit Pawar) आणि टीम सरपंच यांच्यात झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रशांत पवार यांच्या नेतृत्वातील एनसीपी (अजित पवार गट) टीमने फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर गौस आणि अनिकेत सलामीला आले होते. राहुल मोहजे यांनी पहिल्याच चेंडूवर गौस यांना बाद केलं. गौस ‘कॉअ बिहाइंड’ झालेत. त्यामुळं विकेट गमावत एनसीपी संघाच्या खेळीला सुरुवात झाली. यानंतर अमोल कांबळे आले. परंतु चौथ्या चेंडूवर राहुल यांनी अनिकेत यांना धावबाद केले. त्यावेळी अपील झाली. ‘रिव्ह्यू’नंतर तिसऱ्या पंचांनी अनिकेत यांना ‘नॉट आऊट’ घोषित केले.

अजय यांचं दुसरं षटकही एनसीपी (NCP)साठी महाग ठरलं आणि अमोल झेलबाद झालेत. त्यानंतर सारंग मैदानावर फलंदाजीला आले होते. दुसऱ्या षटकापर्यंत एनसीपीचं धावफलक 2 बाद 8 धावा होते. तुषार ताजने यांनी तिसऱ्या षटकात ‘वाइड’ने धावसंख्या वाढवली. एनसीपीच्या खेळाडूंनी धावाही काढल्या. त्यामुळं धावसंख्या 27 झाली.

चौथं षटक पुन्हा राहुल मोहजे यांनी टाकलं मात्र ते सरपंच संघाला महाग ठरलं. त्यामुळं धावसंख्या 2 बाद 36 वर पोहोचली. तौसिफ खान यांनी अखेरचं पाचवं षटक टाकलं. त्यांनी सहा चेंडूत 8 धावा देत एक गडी धावबाद केला. एनसीपीचा डाव 3 बाद 44 धावांवर आटोपला.

सरपंच संघानं 45 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी सलामीला अनिल आणि तौसिफ खान मैदानावर उतरले. अनिकेत यांनी गोलंदाजीला सुरुवात करताच सरपंच संघानं पहिल्याच चेंडूपासून फटके मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकात 9 धावा सरपंच संघानं केल्या. सारंग यांच्या दुसऱ्या षटकात अनिल यांनी एकापाठोपाठ दोन चौकात मारले.

चौथ्या चेंडूवर यष्टिरक्षक अनिकेत यांनी अनिल यांना झेलबाद केले. त्यानंतर सरपंच टीमकडून तुषार ताजणे मैदानात उतरले. त्यांनी येताच षटकार ठोकला. धावसंख्या 1 बाद 23 झाली. अनिकेत यांनी आपल्या या षटकात मोजक्याच धावा दिल्या. तीन षटकांत धावसंख्या 1 बाद 26 अशी होती.

अभिनव यांनी चौथ्या षटकाला सुरुवात केली त्यावेळी विजयासाठी 9 चेंडूत 13 धावा सरपंच संघाला हव्या होत्या. मात्र खेळाडूंनी फटकेबाजी केल्याने 7 चेंडूत 6 धावा अशा परिस्थितीत सामना पोहचला. हे षटक संपेपर्यंत 1 गडी बाद 40 अशी सरपंच टीमची परिस्थिती होती. अखेरचं षटक गौस यांनी टाकलं. त्यात तौसिफ खान यांनी 2 चेंडूत 2 धावा गरजेच्या असताना विजयी षटकार लगावला. यामुळे आठ गडी राखत सरपंच टायटन्स यांनी सामना जिंकला.

‘सरकारनामा’चे विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहेरे यांच्या हस्ते सरपंच टीमच्या तौसिफ खान यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 16 चेंडूत त्यांनी 29 धावाा केल्या. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT