Zadiboli & Vidarbha. Sarkarnama
विदर्भ

Gondia : पूर्व विदर्भातील साहित्यिकांना डावलले; स्वतंत्र राज्याची मागणीचा पुन्हा पेटणार

Sahitya Sammelan : आभासी मराठी साहित्य संमेलनातून झाडीबोलीचा पत्ता कट

अभिजीत घोरमारे

Demand of Vidarbha : महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी महाराष्ट्रात अनेक भाषेतून व्यवहार केला जातो. त्यातल्या त्यात पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये झाडीबोली भाषेला फारच महत्त्व आहे. गोंदिया येथे ही भाषेला टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने साहित्यिकांचा जागर सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत झालीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. यातून आता स्वतंत्र विदर्भाची मागणी पेटण्याची शक्यता आहे.

झाडीबोली भाषेपासून भाषा संचालनालय विभागही अनभिज्ञ नाही. असे असतानाही 20 व 21 जानेवारीला आयोजित आभासी साहित्य संमेलनात पूर्व विदर्भाच्या झाडीबोली भाषेला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे साहित्यिकांमध्ये नाराजी आहे. साहित्यिकांनीही आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हे वर्तविली आहे.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातअंर्गत येत असलेल्या भाषा संचालनालयाकडून 20 व 21 जानेवारीला आभासी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ‘जागर बोलींचा’ या सत्रात बोली भाषा कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनात मालवणी, दखनी, पावरा, अहिराणी, तावडी, डांगी, भिल्ली, वाघडी, आगरी या बोलीभाषेला स्थान देण्यात आले आहे. मात्र पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांच्या दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या झाडीबोली भाषेला स्थान देण्यात आलेले नाही.

शासनाच्या या दुजाभावामुळे पूर्व विदर्भातील साहित्यिक संतापले आहेत. भाषा संचालनालयाला झाडीबोलीचा विसर कसा पडला? असा सवालही साहित्यिकांकडून केला जात आहे. या माध्यमातून राज्य शासन विदर्भाला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप पुन्हा एकदा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. राज्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत. दुसरीकडे पावलोपावली विदर्भावर अन्याय होत आहे. साहित्य क्षेत्रही यातून सुटलेले नाही. त्याचा प्रत्यय आता आला आहे. झाडीबोली भाषेला टिकवून ठेवण्यासाठी साहित्यिकांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी पूर्व विदर्भात झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.

आतापर्यंत 31 झाडीबोली साहित्य संमेलन घेण्यात आले आहेत. तब्बल तीनशेहून अधिक साहित्याचे प्रकाशन झाले आहे. असे असूनही झाडीबोली भाषेला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप आता होत आहे. सरकारच्या या कृत्याची कारणमिमांसा कळू शकेल काय? अशी ही विचारणा झाडेपट्टीतील साहित्यिकांकडून केली जात आहे.

झाडीबोली साहित्य संघ जिल्हाध्यक्ष पवन पाथोडे ‘सरकानामा’शी बोलताना म्हणाले की, आभासी मराठी साहित्य संमेलनात अनेक भाषांना स्थान देण्यात आले आहे. मात्र झाडीबोली भाषेला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे राज्य शासनाचे विदर्भाविषयी हित किती आहे, हे समोर येत आहेत. जाणीवपूर्वक झाडीबोली भाषेला डावलण्यात आले आहे. त्यामुळे आभासी साहित्य संमेलन पुन्हा विदर्भाच्या मागणीला पेटवणार अशी चर्चा आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT