Gondia : वा रे पठ्ठ्या... एकावर एक सात हाफपॅंट त्यात मोबाइल अन् ब्लूटूथने सरकारी परीक्षेत कॉपी

State Excise Exam : मोबाइल केला जप्त; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाला गोंदियात पकडले.
Copy in Exam.
Copy in Exam.File Photo
Published on
Updated on

Malpractice : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी तरुण जिवाचे रान करतात. प्रसंगी सव्यापसव्य मार्गाचा वापर करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक प्रकार गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाने एकावर एक अशा तब्बल सात हाफपॅंट (अंतर्वस्त्र) घातल्या. त्यात लपविलेल्या मोबाइलच्या मदतीने त्याने कॉपी करण्याचा प्रयत्न केला. ‘मेटल डिटेक्टर’मुळे हा प्रकार उघडकीस आला.

युवकाने या हाफपॅंटमध्ये मोबाइल लपवून ठेवला होता. त्याला ‘ब्लूटूथ’ जोडलेले होते. परीक्षेत सुरू असलेला हा गैरप्रकार पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी युवकाला ताब्यात घेतले. या तरुणावर आता तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Copy in Exam.
Gondia Shoot Out : माजी नगरसेवक यादव यांना मारण्यासाठी 40 लाखांची सुपारी

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील राजीव गांधी आयटीआय येथे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे भरती परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामटाकळी येथील धीरज महासिंह सुंदर्डे (वय 19) हा गोंदियात आला होता. धीरजने परीक्षेला येताना चक्क एकावर एक अशा सात हाफपॅंट घातल्या. त्यात मोबाइल लपवून ठेवला.

धीरज पेपर सोडवित असताना त्याच्या हालचाली बघून एमएसएफ कंपनीतील एक महिला व दोन पुरुष पर्यवेक्षकांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. संशय बळावल्यानंतर या पर्यवेक्षकांनी या प्रकाराची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अतुल बन्सोडे यांना दिली. निरीक्षक बन्सोडे (वय 40) यांनी धीरजची तपासणी केल्यानंतर त्यांना त्याच्याजवळ ‘ब्लूटूथ इअरफोन’ आढळला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘इअरफोन’च्या माध्यमातून धीरज परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे दुसऱ्याकडून मागवित असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्या खोलीत नेत ‘मेटल डिटेक्टर’च्या साहाय्याने तपासणी केल्यानंतर त्याने सात अंतर्वस्त्रांच्या आत मोबाइल लपविलेला होता. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तातडीने त्याची माहिती तिरोडा पोलिसांना देण्यात आली. धीरजविरुद्ध पोलिसांनी तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर नमूद परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना प्रतिबंध अधिनियम 1982 अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

परीक्षा केंद्रात झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शासकीय परीक्षांमधील गैरप्रकाराचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अशात गोंदियात घडलेल्या या घटनेमुळे गैरप्रकार करणारे कायद्यालाही घाबरत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचे मोठे आव्हान सरकारी यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Copy in Exam.
Gondia : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com