Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी 25 पक्ष एकत्र; फडणवीसांचा 'इंडिया आघाडी'वर हल्लाबोल

Ganesh Thombare

Washim News: "ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी देशातील 25 राजकीय पक्ष एकत्र आले आहेत", असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह 'इंडिया आघाडी'वर केला. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी वाशीममध्ये ओबीसींच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.

"राहुल गांधी यांना आता कुठं ओबीसींची काळजी वाटायला लागली, पण ओबीसींसाठी फक्त भाषण करून काही होत नाही. पंतप्रधान मोदी ओबीसी नेते आहेत, ते ओबीसींच्या पाठीशी आहेत. देशातील 60 टक्के मंत्री ओबीसी आणि एससी, एसटी समाजातील आहेत. असे आत्तापर्यंत काधीही घडले नाही. काँग्रेसने आतापर्यंत 250 मुख्यमंत्री दिले, पण त्यातील फक्त 17 टक्केच ओबीसी होते", असा टोला त्यांनी काँग्रेसला लागावला.

"भाजपने आतापर्यंत दिलेल्या 68 मुख्यमंत्र्यांपैकी 31 टक्के ओबीसी आहेत. आमच्या पंतप्रधानांची आम्ही जात सांगत नाहीत. मात्र, ओबीसी पंतप्रधान झाले तर काहींना पाहवत नाही, काँग्रेसने ओबीसींसाठी काहीही केले नाही, काँग्रेसने एवढ्या वर्षात ओबीसींची जनगणना का केली नाही ? मग त्यांना आताच का ओबीसींची आठवण झाली ?", असा घणाघात फडणवीसांनी केला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होणार आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठी झाल्यास अनेक संधी निर्माण होतील. ओबीसींची जनगणना करायला आम्ही नाही म्हटलेलं नाही. मात्र, हा जातीजातीत भांडण लावण्याचा प्रयत्न आहे", असेही फडणवीस म्हणाले. तसेच मराठा आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ओबीसी समाजाच्या मागण्यादेखील योग्यच आहेत, असंही फडणवीसांनी या वेळी सांगितले.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT