Devendra Fadnavis Sunil Kedar chandrashekhar bawankule sarkarnama
विदर्भ

BJP Politics : काँग्रेस आमदाराच्या बालेकिल्ल्याला भाजपचा सुरुंग? देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनुकळे स्वतः येणार!

Rajesh Charpe

BJP Politics : भाजपच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीचे एक दिवशीय अधिवेशन माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात आयोजित केले आहे. या अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार आहेत. सावनेर येथे अधिवेशन घेऊन भाजप केदारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे..

विशेष म्हणजे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील 1400 कोटी रुपयांची वसुली केदार यांच्याकडून करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपचे प्रवक्ते व ओबीसी सेलचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख हे सावनेर येथे साखळी उपोषण करत आहेत.

आठ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया सुरू केली नाही तर आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. यात उद्या रविवारी (ता.४) भाजप अधिवेशन घेऊन राजकीय वातावरण अधिकच तापवणार असल्याचे दिसून येते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी भाजपच्या अधिवेशनाची माहिती दिली. सावनेरची निवड का केली? या प्रश्नाचे उत्तर देताना कार्यकर्त्यांची इच्छा होती.सावनेर येथूनच विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापण्याचा पक्षाने निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

सावनेरच्या एस.टी. स्टँड जवळील सेलिब्रेशन सभागृहात हे अधिवेशन होणार आहे. शेतकऱ्यांना वीज माफी दिल्याने अधिवेशना देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव अधिवेशनात पारित केला जाणार आहे. अधिवेशनात जिल्ह्यातील सद्यची राजकीय परिस्थितीवर आशिष देशमुख प्रस्ताव मांडणार आहेत. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारची चर्चा देखील अधिवेशनात होईल.

केदार निवडणुकीच्या मैदानातून 'बाद'

लोकसभेच्या निवडणुकीत कामठी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. या सभेत फडणवीस यांनी केदारांच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून त्यांची जागा तुरुगांत असल्याचे सांगितले होते. नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात केदारांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ते सध्या जामिनावर आहेत. दोषसिद्धीला स्थगिती द्यावी यासाठी केदार उच्च व सर्वोच न्यायालयात गेले होते. मात्र दोन्ही न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली आहे. केदारांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली असल्याने त्यांना पुढील विधानसभेची निवडणूक लढता येणार नाही.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT