Prakash Ambedkar : निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकरांना कशाची भीती? भर सभेत बोलले 'मराठा समाज...'

Prakash Ambedkar Maratha Reservation OBC : तुम्ही आरक्षणाची चिंता करू नका. ते देणे सरकारचे काम आहे. मात्र ते टिकणार की नाही हे कोर्ट ठरवेल, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी बांधवांना केले.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. उपोषण करत त्यांनी सरकारला देखील इशारा दिला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको म्हणून लक्ष्मण हाके यांनी उपोषण केले. आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण होत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळीच भीती व्यक्त केली आहे.

'मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गावागावात मराठा आणि ओबीसी असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी काही जण दंगली घडून आणतील, भडकाभडकी होईल' अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. ही यात्रा नांदेडमध्ये आली असता उपस्थित ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर यांनी तुम्ही आरक्षणाची चिंता करू नका. ते देणे सरकारचे काम आहे. मात्र ते टिकणार की नाही हे कोर्ट ठरवेल, असे म्हटले.

Prakash Ambedkar
Shinde - Fadnavis - Pawar Government : थकहमी साखर कारखान्यांना नव्हे, मतांना; त्यातही सरकारने उघडपणे 'काटा' मारलाच

येत्या दोन महिन्यात अनेक जण येतील. दंगल करायला सांगतील. पण तुम्ही त्यांना सांगा आधी तुमच्या मुलांना दंगलीत पाठवा मग आम्ही येतो. येणाऱ्या काळात राज्यात दंगल, भडकाभडकी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सभेला या!

प्रकाश आंबेडकर यांनी काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे सात ऑगस्टला होणार आहे. समारोप प्रसंगी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी तुम्ही या असे आवाहन ओबीसी बांधवांना प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Prakash Ambedkar
Kolhapur Congress News : काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश; एक महिन्याचा दिला अल्टिमेटम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com