Sachin Waze-Devendra Fadnavis-Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : सचिन वाझेच्या देशमुखांबाबतच्या ‘त्या’ पत्रावर फडणवीसांचा नवा स्टॅंड; ‘...तर निश्चित चौकशी होईल’

Anil Deshmukh 100 Crore Recovery Case : अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना आपल्या स्वीय सहायकांमार्फत पैसे गोळा करीत होते, असा आरोप सचिन वाझे याने करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 03 August : सचिने वाझे याच्या पत्रावरून राज्याचे राजकारण तापले असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अद्याप ते पत्र अद्याप पाहिले नसल्याचे सांगितले.

मात्र, आपल्या सांगण्यानुसार मला पत्र पाठवले असेल तर त्याची खातरजमा केली जाईल. चौकशी केल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असे सांगून त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास टाळले.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) राज्याचे गृहमंत्री असताना आपल्या स्वीय सहायकांमार्फत पैसे गोळा करीत होते, असा आरोप सचिन वाझे याने करून खळबळ उडवून दिली आहे. सकाळपासून वाझेच्या पत्रावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी गृहमंत्री देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून वाझे बोलत असल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे या विषयावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भाजपचे नागपूर शहराची बैठक आटोपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, सचिन वाझे याचे पत्र मी वाचले नाही. त्याने मलाही पत्र पाठवले, हे मला माध्यमातूनच कळाले आहे. दोन दिवसांपासून मी नागपूरला आलो आहे. पत्र पाहिल्यानंतर त्यावर बोलता येईल. मात्र, असे पत्र वाझे याने पाठवले असेल, तर निश्चितच त्याची चौकशी केली जाईल.

‘एक तर तू राहशील किंवा मी राहील’ या उद्धव ठाकरे यांच्या भाषेवर फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या डोक्याचं भान सुटले आहे. ते नैराश्यात आहेत आणि नैराश्यातून ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, त्यावर उत्तर देण्याची गरज नाही. एखादा व्यक्ती नैराश्यातून डोकं बिघडल्यासारखे बोलतो, तेव्हा त्याला फार उत्तर द्यायचे नसते.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून आणि कृतीततून दाखवून दिले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT