Karmala Politics : मोहिते पाटील देणार संजय शिंदेंना धक्का; जयवंतराव जगताप-नारायण पाटील एकत्र येणार

Jaywantrao Jagtap And Narayan Patil Come Together : विद्यमान आमदार संजय शिंदे हे महायुतीकडे असूनही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यातून 41 हजार 511 मतांचे लीड मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Dhairyasheel Mohite Patil-Jaywantrao Jagtap-Narayan Patil
Dhairyasheel Mohite Patil-Jaywantrao Jagtap-Narayan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 August : माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळविल्यानंतर करमाळा मतदारसंघातील राजकीय घडमोडी गतिमान होताना दिसत आहेत.

विशेषतः मोहिते पाटील यांनी करमाळ्यात लक्ष घातले असून आपली सारी ताकद माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी उभी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून आमदार संजय शिंदे यांना धक्का देण्याची तयारी मोहिते पाटील यांनी चालवल्याचे दिसून येत आहे.

करमाळ्याच्या राजकारणाचे ‘की पॉईंट’ असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap) आणि नारायण पाटील यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया मोहिते पाटील यांनी केली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जगताप आपली ताकद नारायण पाटील यांच्या पाठीशी उभी करतील, अशी सध्याची समीकरणे आहेत, त्यामुळे आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्यासाठी करमाळ्याची परीक्षा थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदार संजय शिंदे हे महायुतीकडे असूनही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यातून 41 हजार 511 मतांचे लीड मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातून नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे करमाळ्यात शरद पवार गटाचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी मोहिते पाटील यांच्यासाठी परिश्रम घेतले. त्याचवेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही आपली ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभी केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. करमाळ्यातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवार निश्चित मानली जात आहे. तसे संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरमध्ये दिले हेाते.

Dhairyasheel Mohite Patil-Jaywantrao Jagtap-Narayan Patil
CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर महायुतीचे वर्चस्व; विधानसभानिहाय समितीत विरोधकांना डावलले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी निश्चित असलेल्या नारायण पाटील यांच्यासाठी आता मोहिते पाटील यांनी सूत्रे हलवायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून करमाळा पंचायत समितीत आढावा बैठक घेतल्यानंतर मोहिते पाटील यांनी नारायण पाटील यांना सोबत घेऊन बाजार समितीच्या कार्यालयात सभापती जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीची राजकीय चर्चा करमाळा तालुक्यात होताना दिसत आहे.

या भेटीवेळी माजी आमदार जगताप यांनी नारायण पाटील यांच्याकडे पाहत करमाळा तालुक्याच्या राजकारणात ज्यावेळी दोन सुवासिनी एकत्र येतात. त्यावेळी निश्चितच निकाल चांगला लागतो, असे सूचक विधान केले. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांना मदत करणारे जयवंतराव जगताप हे आगामी निवडणुकीत आपली भूमिका बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जयवंतराव जगताप कोणाला मदत करतात, तोच करमाळ्याचा आमदार होतो. कारण, जगताप यांच्याकडे मताचा एकगठ्ठा तो अटीतटीच्या लढतीत उपयोगठी ठरतो. त्यामुळे संजय शिंदे यांच्या पाठीशी मागील विधनसभा निवडणुकीत खंबीरपणे उभे राहिलेले जगताप आता आपली ताकद नारायण पाटील यांच्या पाठीशी उभी करण्याची शक्यता आहे.

Dhairyasheel Mohite Patil-Jaywantrao Jagtap-Narayan Patil
Jayant Patil : पवारांच्या हवाल्याने दिलेल्या दिल्लीतील घडामोडींच्या विधानावरून जयंत पाटलांची पलटी; नेमकं काय घडलं?

जयवंतराव जगताप यांनी साथ सोडली, तर आमदार संजय शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. करमाळा बाजार समितीत केलेल्या मदतीची परतफेड जगताप यांनी मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मदत करून केली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी असली तर आतापासूनच राजकीय जुळणीला सुरुवात झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com