Devendra Fadnavis on Sharad Pawar. Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : शरद पवारांच्या नव्या पक्षाबाबत फडणवीस म्हणाले...

प्रसन्न जकाते

Nagpur News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना मिळाले आहे. शरद पवार यांच्या नव्या पक्षाचे नावही ठरले आहे. यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी शरद पवार यांना नव्या पक्षासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरले आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. गुरुवारी (ता. आठ) त्यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

नागपुरात आढळलेल्या स्फोटकसदृष्य वस्तुबाबत फडणवीस यांनी सांगितले की, ज्या बसमध्ये संशयास्पद वस्तू सापडली होती, ती बस गडचिरोलीवरुन आली होती. त्यात एका डब्यात बॉम्बसदृष्य वस्तू आढळली. डेपो मॅनेजरने सगळी माहिती कळविली आहे. या संशयास्पद वस्तूची तपासणी करणयत आली आहे. त्यात स्फोटके आढळलेली नाही. यासंदर्भातील सखोल सगळी करणार आहे. गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. बस कुठे कुठे गेली. कंडक्टर कोण होते, प्रवासी कोण होते या सगळ्यांची माहिती घेण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती मिळताच जाहीर करण्यात येईल.

जमिनीबाबत सूट

विदर्भात नझुलच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहे. या जमिनींच्या हस्तांतरणाची मोठी अडचण होती. सरकारच्या नियमांमध्ये शर्तभंग झाला असल्यास अशांना 2025 पर्यंत नोंदीसाठी कर न आकारता सूट देण्यात आली आहे. पाच टक्क्यांची अटही दोन टक्क्यांवर आणण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नझुलच्या जमिनीबाबत बोलताना स्पष्ट केले.

मनसेसोबत नियमित भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत झालेली बैठक हा नवीन मुद्दा नाही. मनसेसोबत अशा अनेक बैठकी झाल्या आहेत. अलीकडच्या काळात झालेली बैठकही नियमित होती. त्यात नवीन काहीच नाही. आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवत ही बैठक झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत. मात्र हे सर्व चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदगीरच्या तपासावर ठाम

उदगीर पोलिस स्टेशनच्या परिसरात बोकड कापण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. मात्र यासंदर्भात चुकीची माहिती पसरविण्यात आली आहे. बोकड कापल्याचा प्रकार अंधश्रद्धेतून घडलेला नाही, असा खुलासात्मक पुनरूच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले की, उदगीर पोलिस ठाण्यात गुन्हे कमी करण्यासाठी बोकड कापण्यात आलेला नाही. पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांने नवीन वाहन खरेदी केले होते. त्यामुळे त्याने पार्टी दिली. विषय कोणताही असला तरी पोलिस ठाण्याच्या आवारात अशाप्रकारे बोकड कापणे चुकीचेच आहे, असे फडणवीस म्हणाले.

उदगीर पोलिस ठाण्यातील संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. यात दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. पोलिस दल आपल्या शिस्तीसाठी ओळखला जातो. अशात पोलिस ठाण्याच्या आवारात अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन करणे आणि त्या पशुचा बळी देणे पूर्णत: चुकीचे आहे असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT