NCP News : अजितदादांच्या नावाची कोनशिला फोडली; 'राष्ट्रवादी'च्या दोन्ही गटांतील समर्थक भिडले

sharad Pawar group : शहरातील राष्ट्रवादीचे मुख्य कार्यालय शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बुधवारी (ता.7) 'राष्ट्रवादी भवन'मध्ये शरद पवार यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी जमले होते.
NCP News
NCP Newssarkarnama
Published on
Updated on

Pune : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय दिल्याचे पडसाद पुण्यात उमटले. पुणे शहरात राष्ट्रवादीचे मुख्यालय असलेल्या कार्यालयातील कोनशिलेवर अजित पवार यांचे नाव असल्याने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही कोनशिला फोडण्यात आली. तसेच कार्यालयावरून घड्याळ चिन्ह हटवण्यात आले. मात्र, अजित पवारांच्या नावाची कोनशिला हटवल्याने अजित पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाकडे धाव घेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना याचा जाब विचारला. त्यावरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (NCP News)

NCP News
Jitendra Awhad News : 'तुम्ही हातातलं घड्याळ चोरलं, पण मनगट आमच्याकडेच' ; आव्हाडांकडून अजित पवार लक्ष्य!

पुणे शहरातील राष्ट्रवादीचे मुख्य कार्यालय शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बुधवारी (ता.7) 'राष्ट्रवादी भवन'मध्ये शरद पवार यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी जमले होते. शरद पवार यांच्या बाजुने भक्कमपणे उभा राहण्याचा निर्धार त्यांनी या वेळी केला. मात्र, काही कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी 'राष्ट्रवादी भवन'मध्ये अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडली.

हा प्रकार कळल्यानंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अजित पवार गटाकडून जाब विचारण्यात आला. अजित पवार यांचे समर्थक दत्ता सागरे यांनी थेट प्रशांत जगताप यांना घेरले. मात्र, 'दोन तीन कार्यकर्त्यांनी मिळू हे केले. मी तंबी दिली आहे. हा घडलेला प्रकार शेवटचा, असे पुन्हा घडू नये', असे प्रशांत जगताप यांनी त्यांना सांगितले. मात्र, सागरे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी प्रशांत जगताप यांच्याशी वाद घातला. ऑफिसची कृपा ही दादांची असल्याचे सागरे म्हणाले. त्यावर ऑफिस करताना सगळे होते, असे प्रत्युत्तर प्रशांत जगताप यांनी दिले.

असा प्रकार परत होता कामा नये. हे राष्ट्रवादीचे कल्चर नाही. मागील सात आठ महिन्यांत मी चुकीच्या घोषणा करून दिल्या नाहीत. दोन्ही बाजूने हे पाळले पाहिजे. चुकीच्या घोषणा नको. चुकीचे आरोप नको. आपण आपले विचार घेऊन लोकांपर्यंत जाऊ, असे प्रशांत जगताप यांनी आवाहन अजित पवार गटाला केले.

(Edited By Roshan More)

NCP News
Nanded BJP News : भाजपचे वाॅरिअर्स नांदेड काबीज करणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com