Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Sarkarnama
विदर्भ

हाउ इज द जोश! गोव्यातील विजयानं भाजप अन् फडणवीसांमध्ये दहा हत्तींचं बळ

सरकारनामा ब्युरो

नागपूर : गोव्यात (Goa Assembly Election) भाजपने मिळवलेल्या विजयानंतर प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे महाराष्ट्रात जंगी स्वागत करण्यात येत आहे. ११ मार्च रोजी मुंबईत भाजपच्या (BJP) सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात, वाजत - गाजत आणि मिठाई वाटून स्वागत केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आता लक्ष्य मुंबई महापालिका असे म्हणतं प्रत्यक्षपणे मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले होते.

त्यानंतर आता आज देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये आगमन झाले. यावेळी भाजपच्या नागपूरमधील कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली असून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करत भाजपने एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत नागपूर महापालिका निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असल्याच बोललं जात आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेच्या आशीर्वादामुळे यश मिळाले. यापुढच्या काळात मुंबई असो की नागपूर असो किंवा कोणत्याही महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका असो. तिथे भाजप एक नंबरला राहणार असून भाजपचाच झेंडा लागणार आहे.याशिवाय सरकार कधी पडेल या संदर्भातील चर्चा मला करायची नाही, कारण त्यावर पुन्हा वाद निर्माण होतात. पण २०२४ ला भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल, असेही सुचूक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रीय स्तरावर काम केले की जबाबदारी बदलते. त्यावेळी सिद्धतेचे आव्हान असते. आज नागपुरकांनी केलेला हा सत्कार मी पंतप्रधान मोदी आणि गोव्याच्या जनतेकडून स्वीकारतो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तुमचं पुढचं मिशन काय? या प्रश्नावर ते म्हणाले, आमचं मिशन भाजप देईल तेच. पण त्यात केवळं जनतेचं कल्याण असणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT