धक्कादायक : कुचिकांवर बलात्काराचा आरोप करणारी बेपत्ता तरूणी सापडली गोव्यात

ही मुलगी गोव्यात आढळून आली आहे. या मुलीने स्वत: फोन करून आपल्याला ही माहिती दिल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
Raghunath Kuchik
Raghunath Kuchik Sarkarnama

पुणे : पुण्यातील शिवसेना (Shiv Sena) उप-नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर एका तरुणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मागील दोन दिवस ही तरूणी बेपत्ता झाल्याचा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला होता. आता ही मुलगी गोव्यात आढळून आली आहे. या मुलीने स्वत: फोन करून आपल्याला ही माहिती दिल्याचे वाघ यांनी सांगितले.

वाघ यांनी याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 'शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने अत्याचारित केलेली मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. काल रात्री साडे अकराच्या आसपास तिचा मला फोन आला होता. तिनं सांगितलं की मी कुठं आहे, मला माहिती नाही. पण मला मदतीची गरज आहे, असं ती म्हणाली. रात्रीची वेळ असल्याने मी तिला आजूबाजूच्या घरांचे दरवाजा ठोठवायला सांगितलं. त्यापध्दतीने तिनं केलं. एका ग्रहस्थाने मदत केली. त्यांच्याशी मी बोललेट,' असं वाघ यांनी सांगितलं.

Raghunath Kuchik
इतिहास लिहिला गेल्यास तुम्ही चुकीच्या बाजूला असाल! अमेरिकेचा भारताला सूचक इशारा

कोलवा हे त्या गावाचं नाव असल्याचं गृहस्थांनी सांगितलं. गोव्यातील मडगावमधलं हे गाव आहे. त्या गृहस्थाला मुलीला घेऊन गोवा पोलिसांकडे जायला सांगितले. दरम्यानच्या काळात तिच्याशी मी बोलले. त्यावेळी तिनं सांगितलं की, काही लोकं होती, त्यात पोलीसही होते. मला इंजेक्शन देण्यात आली. माझ्याकडून काही पेपर्सवर सह्या घेतल्या. नंतर काय झालं आठवत नाही. आता याठिकाणी पडली आहे, असं मुलीनं सांगितल्याची माहिती वाघ यांनी दिली आहे.

बावळटपणा कधी आणि कुठे करावा?

तिचा फोन झाल्यानंतर मी ताबडतोब पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत सांगितले. त्यानुसार आता पुणे शहर आणि ग्रामीणच्या टीम गोव्यात पोहचतील. मुलीचे आई-वडीलही घरून तिथं पोहचतील. मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहितीही वाघ यांनी दिली. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. जबाबदार लोकांनी बेजबाबदार वक्तव्य करू नये. आपला बावळटपणा कधी आणि कुठे करावा, याचं तारतम्य बाळगायला हवं, अशी टीका वाघ यांनी केली.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

पुणे पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. संजय राठोड नंतर रघुनाथ कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची (Pune Police) भूमिका संशयास्पद वाटत आहे. या प्रकरणाचे पूजा चव्हाण प्रकरण करु नक, अशी टिका चित्रा वाघ नुकतीच पुण्यात केली होती. सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्यात पुणे पोलीस आयुक्त व्यस्त आहे. शहरातील 4 ते 5 रुग्णालयात तरुणीचा गर्भपात करण्यासाठी तिला नेण्यात आले होते. त्यापैकी 2 रुग्णालयाची पोलिसांनी चौकशी केली, परंतु एका नामांकित रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी कुचिकने त्याच्या ओळखपत्राचा वापर केला, त्या रुग्णालयाची अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाही, असं वाघ यांनी सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com