Dadarao Keche Sarkarnama
विदर्भ

Dadarao Keche : दादाराव केचे यांना दिलेला शब्द फडणवीस यांनी पाळला

Maharashtra CM Devendra Fadnavis Dadarao Keche Legislative Council Vidarbha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर विदर्भातून दादाराव केचे यांना संधी दिली आहे.

Rajesh Charpe

Nagpur Politic : विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस कोणाला संधी देणार याची विदर्भात सर्व इच्छुकांना उत्सुकता लागली होती. आज तीन नावे जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ती संपवली. विदर्भतून त्यांनी दोघांना संधी दिली आहे. यात माजी आमदार दादाराव केचे यांचा समावेश असल्याने अनेक युवा नेत्यांना धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव यांच्यासाठी आपल्या मतदारसंघाचा त्याग केले होता. प्रदेश उपाध्यक्ष करून निवडणुकीच्या काळात त्यांची तात्पुरती नाराजी दूर करण्यात आली होती. मात्र इतक्या लवकर विधानपरिषदेत संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल हे कोणलाही अपेक्षित नव्हते.

दादा केचे यांनी वर्धा जिल्ह्याचे विधमान खासदार अमर काळे यांना आर्वी मतदार सांघातून दोनवेळा पराभूत केले होते. काळे आधी काँग्रेसमध्ये होते. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात केले होते. विधानसभेच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे दहा वर्षापासून निवडणुकीची तयारी करीत होते.

दुसरीकडे दादा केचे दोनवेळाचे विजयी आमदार असल्याने त्यांचे तिकीट कसे कापायचे असा प्रश्न भाजपला (BJP) पडला होता. मात्र फडणवीस यांनी वानखेडे यांना उमेदवारी देऊन केचे यांना धक्का दिला होता. त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला होता. दादांनी बंडखोरीचे संकेत दिले होते. उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

फडणवीस यांच्यावर रोषही व्यक्त केला जात होता. दुसरीकडे दादांना डावलून निवडणूक जिंकणे अवघड असल्याची जाणीव असल्याने सर्वानी त्यांची समजूत काढली. स्वतः फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत घातली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना भेटायला दिल्ली बोलवले होते. त्यामुळे केचे यांनी माघार घेतली. लगेच त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. दादांनी सुद्धा सुमित वानखेडे यांच्या प्रचारात सहभागी होऊन वानखेडे यांच्या सोबत वाद नाहीत असा संदेश दिला.

त्यामुळे सुमित वानखेडे यांनी खासदार अमर काळे यांच्या पत्नी यांना विधान सभेत मोठ्या फरकाने पराभूत केले. तत्पूर्वी आमदार असताना वनखेडे हे आपल्या मतदार संघात लुडबुड करीत असल्याची तक्रार केली होती. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे भाजपात मोठा वाद निर्माण झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT