Aditya Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
विदर्भ

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंची अडचण वाढणार; दिशा सॅलियन आत्महत्याप्रकऱणाची SIT मार्फत चौकशी होणार

Devendra fadnavis on Disha Salian Case: दिशा सॅलियान प्रकरण पुन्हा चौकशी उघडले जाणार

सरकारनामा ब्यूरो

Devendra fadnavis on Disha Salian Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सुशांतसिंह राजपूत याची सेक्रेटरी दिशा सॅलियान हिच्या आत्महत्येची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत करण्यात येईल अशी घोषणा दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत बोलताना केली. त्यामुळे दिशा सॅलियान प्रकरण पुन्हा चौकशी उघडले जाणार हे आता स्पष्ट झाले.

दिशा सॅलियान (Disha Salian) मृत्यूप्रकऱणाचे पडसाद विधानसभेत उमटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजप शिंदे गटाकडून दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. आता दिशा सॅलियान प्रकऱणी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. दिशाच्या मृत्यूची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

विधानसभेत दिशा सॅलियान मृत्यूचा मुद्दा मांडताच प्रचंड राडा झाला. यावेळी सत्ताधारी भाजप व शिंदे गटाकडून जोपर्यंत एसआयटी स्थापन करत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज सुरु करु देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. आता त्यानंतर फडणवीस यांनी मोठी घोषणा केला आहे.

दिशा सॅलियानच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मांडला. यावेळी राणेंनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा आणि सत्य बाहेर आणा. त्यामुळे दिशा सालिय़ान मृत्यूची फाईल्स पुन्हा ओपन करा अशी मागणी भाजप व शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी दिशा सालियानचा मुद्दा भाजप व शिंदे गटाकडून विधानसभागृहात मांडण्यात आला. यावेळी भाजप व शिंदे गट आक्रमक झाला. सत्ताधार्यांनी या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच मुद्द्यावरुन विधानसभेचं कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले.

राणे म्हणाले, आजही अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचीच केस सीबाआयकडे आहे. दिशा सालियान प्रकऱणात नेमकं कुणाला वाचवलं जात आहेत. या प्रकरणातील तपास अधिकारी दोनवेळा का बदलला गेला? दिशाच्या बिल्डींगचा व्हिडीओ का गायब करण्यात आला? तिच्या मृ्त्युबाबत खुलासा व्हावा अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे. या प्रकऱणात आदित्य ठाकरेंचेच नाव का वारंवार घेतलं जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करुन सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी सत्य बाहेर आणावे अशी ठाम भूमिकाही राणेंनी यावेळी मांडली.

शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुशांत आणि दिशा सालियान केस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT