शेवाळेंना चेंबूरहून अंधेरीला जाताना तीन तीन गाड्या का बदलाव्या लागतात? : युवा सेनेचा बोचरा सवाल

शेवाळे यांचे पराक्रम सर्वांना माहिती आहेत. त्यांच्या मतदार संघातून आता अनेक गोष्टी बाहेर येतील.
 Rahul Shewale-Aaditya Thackeray
Rahul Shewale-Aaditya Thackeray Sarkarnama

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे ( Rahul Shewale) यांनी लोकसभेत बुधवारी (ता. २१ डिसेंबर) बोलताना अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणात (suicide) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यावरून शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. वरिष्ठ नेत्यांसह युवा सेनेकडूनही राहुल शेवाळे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शेवाळेंचे पराक्रम सर्वांना माहित आहेत, त्यांना चेंबूरवरून अंधेरीला जायला तीन तीन गाड्या का बदलाव्या लागतात, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असे आव्हान युवा सेनेच्या (Yuva Sena) कोअर कमिटीचे सदस्य पवन जाधव यांनी शेवाळेंना दिले आहे. (Why do Shewales have to change three motor on their way from Chembur to Andheri?)

सुशांतसिंह प्रकरणावर बोलताना राहुल शेवाळे यांनी AU म्हणजे आदित्य ठाकरे असा उल्लेख केला होता. त्यावरून राज्यात मोठा गदरोळ माजला आहे. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनीही शेवाळे यांचे चारित्र्य तपास असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात बोलताना युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य पवन जाधव म्हणाले की, राहुल शेवाळे यांचे आरोपी चुकीची आहेत. त्यांना हा विषय सभागृहात घेण्याची गरज नव्हती.

 Rahul Shewale-Aaditya Thackeray
पराभव जिव्हारी लागला; ग्रामपंचायतीच्या पराभूत उमेदवारांकडून वाटप केलेल्या पैशांची वसुली सुरू!

आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वाईट शब्दांत बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही. आमचं नेतृत्व शांत भूमिका घेत आहे, म्हणून बोललं जातंय. यापुढे आम्ही काही ऐकून घेणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही जाधव यांनी दिला.

 Rahul Shewale-Aaditya Thackeray
मुंडेंशी वाद झालेल्या राजकारण्यांचे पुढे काय झाले? साबणेंपासून सुरू झालेला सिलसिला सावंतांपर्यंत पोचतो...

उद्धव ठाकरे हे विधीमंडळाच्या सभागृहात गेले. त्यांना प्रशासन कळायला लागलं; म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय. शेवाळे यांचे पराक्रम सर्वांना माहिती आहेत. त्यांच्या मतदार संघातून आता अनेक गोष्टी बाहेर येतील. युवा सेना आणि शिवसेना आता शांत बसणार नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

 Rahul Shewale-Aaditya Thackeray
केसरकरांचा निर्णय सावंतवाडीकरांना रूचला नाही : ग्रामपंचायत निवडणुकीत पानिपत; शिवसेनेची ताकद कायम

राहुल शेवाळे यांचे पराक्रम सर्वांना माहित आहेत, त्यांना चेंबूरवरून अंधेरीला जायला तीन तीन गाड्या का बदलाव्या लागतात, याबाबत त्यांनी सांगावं. दिल्लीत आणि मुंबईत त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांनी बघावं, असेही त्यांनी शेवाळेंना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com