Amravati News : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने जातप्रमाणपत्राच्या प्रकरणात दिलासा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राबाबत टीका करत होते, त्यांचं तोंड आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बंद झालं, असं फडणवीस म्हणाले. (Lok Sabha Election 2024)
देवेंद्र फडणवीस प्रचार सभेत म्हणाले, "आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते, त्यांना आज सुप्रीम कोर्टाने उत्तर दिले आहे. कोर्टानेच राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. कोर्टाने सांगितलं, राणांना जे सर्टिफिकेट दिलं आहे, ते योग्य आहे. ते खरं आहे. अखेर सत्याचा विजय झाला आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याचा मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. अमरावतीमध्ये राणा यांच्यासाठी महायुतीची सभा सुरू असतानाच हा निकाल आला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला. आजच त्यांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला.
सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायाधीश माहेश्र्वरी आणि न्यायाधीश संजय करोल यांच्या खंडपीठापुढं सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता, तर आता लोकसभा निवडणुकीअगोदर नवनीत राणा प्रकरणाचा निकाल लागला आहे. जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप अडसूळ यांनी केला होता. हे प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने आज योग्य असल्याचा निकाल दिला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.