Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांना 'होम ग्राऊंड'मध्येच धक्का? कंत्राटदारांनी घेतला मोठा निर्णय

Nagpur Contractor Strike News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. महसूलमंत्री हेसुद्धा नागपूरचेच आहेत. त्यांनी आता आमच्या थकबाकीकडे लक्ष घालावे अशी विनंती कंत्राटदारांनी केली आहे. महायुतीचे सरकार येताच नागपूर महापालिकेच्या हजार कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे

Rajesh Charpe

Nagpur News : राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहराचा नवा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, जिल्हा नियोजन समितीचा तब्बल बाराशे कोटी रुपयांचा आराखडा त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कंत्राटदारांनी बेमुदत संप पुकारला आहे.

त्यामुळे नागपूरच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर विभागाची सुमारे सहा हजार कोटी रुपये थकवण्यात आल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडे त्यांनी आज आपले थकबाकीची सविस्तर आकडेवारी असलेले निवेदन सादर केले.

राज्य शासनातर्फे धडाधड विकास प्रकल्पाच्या घोषणा केल्या जातात. कामेही सुरू केली जातात. मात्र खर्चाचे नियोजन केले जात नाही. पैसे आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर कंत्राटदार कामे पूर्ण करतो. मात्र, एकूण थकबाकीच्या पाच ते दहा टक्के देऊन नवीन कामे करायला सांगितले जाते. त्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीसुद्धा कंत्राटदारांनी संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे काही टक्के रक्कम देऊन कंत्राटदारांचा शांत करण्यात आले होते. प्रत्येक वेळी पाच दहा टक्के देऊन वेळून मारून नेली जाते. या चालढकलीत छोट्यांचे मरण होते, असे कंत्राटादांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. महसूलमंत्री हेसुद्धा नागपूरचेच आहेत. त्यांनी आता आमच्या थकबाकीकडे लक्ष घालावे अशी विनंती कंत्राटादारांनी केली आहे. महायुतीचे सरकार येताच नागपूर महापालिकेच्या हजार कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी थेट अर्थमंत्री अजित पवार यांना फोन करून नागपूर जिल्हा परिषदेचा अखर्चित निधी खर्च करण्याची परवानगी मिळवून घेतली. नागपूर जिल्ह्याचा विकास आराखडा 1200 कोटी करण्यात आला. अजित दादा नागपूरच्या विकासासाठी निधी देतील असा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

मेयो आणि मेडिकलच्या विकासासाठी निधी मागण्यात आला आहे. तो निधी नागपूरला मिळेल. मात्र कामे कोण करणार असा सवाल कंत्राटदारांचा आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी राज्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या नागभवनचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. या जागेवर मंत्र्यांसाठी नवी बहुमजली इमारात प्रस्तावित करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच आमदार निवासाची इमारत विकसित केली जाणार आहे. मात्र, बांधकाम विभागाचे कंत्राटदाराच संपावर गेले असून आधी थकबाकी दिली तरच नवे कामे घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT