Devendra Fadnavis, Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Fadnavis Vs Thackeray : ठाकरेंकडून ढेकणाची उपमा,शाहांवर कडवट टीका, फडणवीसांचा जशास तसा पलटवार; डोकं फिरल्यासारखा...

Deepak Kulkarni

Nagpur News : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर कडवट टीका केली होती. यात त्यांनी एकतर तू राहशील किंवा मी या इशार्‍याचा पुनरुच्चार करत फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती.

ठाकरेंनी काही जणांना वाटतं, मी त्यांना आव्हान दिले,पण मी कोणत्याही ढेकणांना आव्हान देत नाही,ढेकणांना आव्हान द्यायचं नसतं तर त्यांना अंगठ्यानं चिरडायचं असतं असा हल्लाबोलही केला होता.आता याच टीकेला उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अगदी मोजक्याच शब्दांत विषय संपवला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथे मीडियाशी बोलत होते.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,एखादा व्यक्ती नैराश्यात असताना डोकं बिघडल्यासारखा बोलतो.तेव्हा त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण भाषण करुन अमित शाहांनी जे सांगितलं होतं,औरंगजेब फॅन क्लब.. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं असल्याची खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय. ते सध्या अत्यंत  फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, त्यावर आपण काय उत्तर द्यावं. एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघाडल्यासारखे बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचे नसते अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते..?

पुण्यात शिवसेनेचा (ठाकरे गट) शिवसंकल्प मेळावा शनिवारी (ता.3) पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्याच नेहमीच्या शैलीत मोदी- शाहांसह पुन्हा एकदा भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागली.यावेळी ते म्हणाले,

एक तर तू राहशील किंवा मी राहीन..तुला घालवण्यासाठी मी मैदानात उतरलो पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण.मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा दरोडेखोर.

मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटाने चिरडले जाते. त्यानंतर ते म्हणाले,माझ्या नादाला लागू नका,अरे तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस असंही ठाकरे यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, शाहिस्तेखान हुशार होता.त्याचं बोटावर निभावलं.पुन्हा महाराष्ट्रात आला नाही.पण हे परत आले.त्यांनी शहाणपण घेतलं नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले, त्याचे वळ कुठे कुठे उठले आहेत हे पाहण्यासाठी ते आले आहेत. त्यांचे मोहरके आले.

'औरंगजेब फॅन क्लब...'

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लब म्हणून डिवचलं होतं.या टीकेलाही ठाकरेंनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता.

तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवता. नवाज शरीफचा केक खाणारी औलाद तुम्ही, आम्ही तुमच्याकडून हिंदुत्व शिकायचं अशी जिव्हारी लागणारी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली.त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे गटातलं राजकीय वैर आणखी टोक गाठण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT