Arun Gawli Sarkarnama
विदर्भ

Don Arun Gawli : 'डॅडी' पुन्हा तुरुंगाबाहेर येणार, पण...!

Chaitanya Machale

Nagpur News : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची पुन्हा एकदा तुरुंगातून सुटका होणार आहे. या वेळी तो कायमस्वरूपी तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी त्याला अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य शासनाच्या 2006 च्या शासन निर्णयाचा आधार घेत गुंड अरुण गवळी याने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्याच्या या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीवर खंडणी, खून, अपहरण, धमकी असे विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई (Mumbai) मधील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसेच इतर गुन्ह्यांमध्ये गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने दिली होती.

सध्या तो नागपूरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. यापूर्वी काही घरगुती समारंभासाठी तो तुरुंगातून काही दिवस बाहेर आला होता. मात्र, आता गुंड गवळी कायमचा तुरुंगाच्या बाहेर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 2006 च्या शासन निर्णयाची मदत घेत तो बाहेर येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या अशक्त तसेच निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. याचा आधार घेत डॉन अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती. त्यावर नागपूर (Nagpur) खंडपीठामध्ये सुनावणी पूर्ण झाली होती.

मात्र, कोर्टाने यावर निकाल राखून ठेवला होता. यावर निर्णय देताना कोर्टाने आता गुंड गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीदेखील दिला आहे. जेल प्रशासनाचे उत्तर आल्यानंतर त्याच्या सुटकेबाबत पुढील कार्यवाही होऊ शकते.

शासनाने (State Government) काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेत शिक्षेत सूट मिळवण्यासाठी गवळीने कोर्टासमोर आपला अर्ज सादर केला होता .गवळीने दाखल केलेल्या या याचिकेवर 5 मार्च रोजी सुनावणी पूर्ण झाली होती.

मात्र, त्यावरील निकाल खंडपीठाकडून राखीव ठेवण्यात आला होता. आज शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यावर उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा कालावधी खंडपीठाने दिला आहे.

2006 चा महाराष्ट्र शासनाचा निर्णय काय आहे?

- जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय 65 पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल...

- गवळीचा जन्म 1955 चा असल्याने त्याचे वय सध्या 70 वर्षे आहे..

- जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून तुरुंगात असल्याने गेली सोळा वर्षे तो तुरुंगात आहे.

- म्हणजेच वर्ष 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो...

- त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी, असा निर्णय दिला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT