Lok Sabha Election 2024 : नाना पटोलेंनी जॉनी वॉकरची जबरदस्त अ‍ॅक्टिंग केली!

VBA Vs Nana Patole News : वंचित आणि नाना पटोले यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. काल नाना पटोलेंने प्रकाश आंबेडकरांना पाठिंब्याबाबत प्रस्ताव देण्याचे आवाहन केले होते.
Prakash Ambedkar Nana Patole
Prakash Ambedkar, Nana PatoleSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून (Lok Sabha Election 2024) वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. गुरूवारी पटोलेंनी अकोल्यामध्ये जाऊन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली होती. अजूनही वेळ गेलेली नाही. किती जागा पाहिजे ते सांगा, मी पुढाकार घेतो. मैदान सुरू झालं तर खूप आयुधं आहेत, असे विधान पटोलेंनी केले होते. त्यावर आज वंचितकडून पलटवार करण्यात आला आहे.

वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभेच्या काही जागांवर काँग्रेसला (Congress) पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतरही अकोला येथून आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये (MahaVikas Aghadi) जागावाटपाच्या तिढ्यामुळे आंबेडकरांनी स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यावरून आघाडीतील काही नेत्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असे आवाहन नेत्यांकडून केले जात आहे.

Prakash Ambedkar Nana Patole
Parli Vaijnath Political News : 'संस्था बंद पाडून मुंडे भावंडांनी परळीचा रोजगार पळविला'; कराडांचा गंभीर आरोप

नाना पटोलेंनीही (Nana Patole) काल अकोला येथे जाऊन आंबेडकरांना (Prakash Ambedkar) ऑफर दिले. ते म्हणाले होते की, उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजेत, याचा प्रस्ताव द्यावा. मी पुढाकार घेतो. पुढील लढाई सुरू होईल. मैदान सुरू झालं तर मग खूप मुद्दे आहेत, आयुधं आहेत, असेही पटोलेंनी म्हटले होते. पटोले यांच्या या ऑफरनंतर वंचिनेही पलटवार केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हटले आहे वंचितने?

वंचितने एक्स हँडलवर नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘काल अकोला येथे जाऊन नाना पटोलेंनी जॉनी वॉकरची जबरदस्त अ‍ॅक्टिंग केली. जर तुम्हाला संविधान वाचवायचे आहे तर आमच्या प्रदेश उपाध्यक्ष ड़ॉ. पुंडकर यांना महाविकास आघाडीच्या मीटिंगपासून दीड तास बाहेर का ठेवले, हे नाना पटोलेंनी सांगावे,’ असे वंचितने म्हटले आहे.

काँग्रेस आणि आमच्या नात्यांत फूट पाडण्याचे काम करताना तुम्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच पकडले. त्यादिवसापासून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीच्या बैठकीत येऊ लागले, असा दावाही वंचितकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता वंचित आणि नाना पटोलेंमधील वाद आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

Prakash Ambedkar Nana Patole
Nitin Gadkari News : गडकरींवर दीड कोटींचं कर्ज, जुनी अ‍ॅम्बेसिडर पार्किंगला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com