Akola News : 'नाना, तुम्ही 'गिधाडांच्या' वृत्तीने वागू नका' बावनकुळे यांची बोचरी टीका

BJP MP Sanjay Dhotre : अकोल्याचे खासदार यांचे निवडणुकीत व्हेंटिलेटर काढतील, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चांगलेच चिडले आहेत.
Chandrashekhar Bawankule, Sanjay Dhotre, Nana Patole
Chandrashekhar Bawankule, Sanjay Dhotre, Nana Patole Sarkarnama

Akola Loksabha Election 2024 : अकोल्यात भाजपने खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप यांना तिकीट दिले आहे. काँग्रेस उमेदवार डाॅ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित प्रचार रॅलीत नाना पटोले यांनी खासदार संजय धोत्रे यांच्यावर टीका केली. अकोल्याचे भाजप खासदार ( संजय धोत्रे ) व्हेंटिलेटरवर आहे, त्यांचे व्हेंटिलेटर केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचे व्हेंटिलेटर काढतील, अशी अतिशय गंभीर टीका आणि वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून थेट राज्यात वाद पेटला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अकोल्यात नाना पटोले आले असता त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

नोटबंदी वेळेस मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध केला. त्यावेळी अकोल्याचे खासदार (संजय धोत्रे) देखील होते. ते आता व्हेंटिलेटरवर आहेत. व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचे व्हेंटिलेटरवर काढतील, असा गंभीर दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्याकडे ही माहिती कशी आली, कुठून आली, असा प्रश्न आता विचारला जात असून, खासदार संजय धोत्रे यांचे व्हेंटिलेटर कोण काढणार आणि का काढणार, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule, Sanjay Dhotre, Nana Patole
Girish Mahajan Politics: गिरीश महाजनांचा गर्भित इशारा; 'उन्मेष पाटील यांना परिणाम समजतील'

नाना पटोले यांनी थेट लोकसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांचे व्हेंटिलेटर काढण्याचे सूतोवाच केले आहे. हा अतिशय गंभीर आरोप असून, गेल्या तीन चार वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आणि घरीच एका गंभीर आजारावर संजय धोत्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपाने अकोल्यासह राज्यात खळबळ माजली आहे. धोत्रे यांचे व्हेंटिलेटर कोण काढणार आणि निवडणुकीत ते काढण्यामागे कोणाचा हेतू काय, असे प्रश्नच आता विचारले जात आहे.

मावळते खासदार संजय धोत्रे काही वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. निवडणुका लागल्यानंतर किंवा मतदानाच्या आधी त्यांचे व्हेंटिलेटर केव्हाही निघू शकते. ते त्यांच्या मनावर आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदारांचे नाव न घेता केले, पण त्यांचा थेट अंगुलीनिर्देश संजय धोत्रे यांच्या परिवार आणि भाजपकडे होता.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून एका दुर्धर आजाराने खासदार संजय धोत्रे हे घरीच उपचार घेत आहे. या विषयावर भाजपवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला. त्याला भाजप नेते बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.

नाना, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका, नाना पटोले यांचा असा खरमरीत समाचार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घेतला आहे.

R

Chandrashekhar Bawankule, Sanjay Dhotre, Nana Patole
Congress On Sanjay Raut: सांगलीचा वाद चिघळणार, संजय राऊतांच्या दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com