Agitation of Dr. Ambedkar People Sarkarnama
विदर्भ

DR. Ambedkar Bhavan News : अभिवादन रॅली की, एल्गार मोर्चा; डॉ. आंबेडकर स्मारकाच्या आंदोलनात फूट !

Agitation : जवळपास पावणेदोन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

The Divisional Commissioner reported that the building did not fall in the storm : अंबाझरी तलाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची इमारत पाडल्याप्रकरणी जवळपास पावणेदोन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. हे भवन पाडल्याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज (ता. २६) मोर्चा काढण्यात आला. (A march was held to demand that action should be taken against the contractor for the demolition of this building)

डॉ. आंबेडकर भवनाची इमारत वादळाने पडल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ (एमटीडीसी) व विकास कंपनीकडून सांगण्यात येत होते. परंतु ही इमारत वादळाने पडली नसल्याचा अहवाल विभागीय आयुक्त यांनी राज्य शासनाला दिला. यामुळे आता एमटीडीसीसोबतच गरुडा कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अंबाझरी येथील ४४ एकर जागेमधील २४ एकर जागा तलाव व २० एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी राखीव असल्याचा दावा आंदोलन करणाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या जागेचे आरक्षण बदलून ही संपूर्ण जागा एमटीडीसी विकासासाठी देण्यात आली. एमटीडीसीने ही जागा गरुडा ॲम्युझमेंट पार्क दिली लिजवर दिली. त्यानंतर भवन पाडले गेले. याचा आंबेडकरी जनतेकडून कडाडून विरोध झाला.

नागपुरातील (Nagpur) अंबाझरी तलाव व उद्यानाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन पाडल्याप्रकरणी कंत्राटाविरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि येथे २० एकरमध्ये राज्य सरकारने स्मारक उभारावे, या मागणीसाठी गेल्या पावणे दोन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. तर गेल्या १५७ दिवसांपासून महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) स्मारकाच्या मागणीसाठी कृती समितीने एल्गार मोर्चा काढण्याचे ठरवले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक आणि स्थानिक आमदार यांची बैठक बोलावून आंदोलकांच्या मागणी मान्य केली. तसेच आंदोलन न करण्याची विनंती केली.

कृती समितीतील काही संयोजकांनी फडणवीस (Devendra Fadanvis) यांची सूचना मान्य केली. परंतु काही संयोजकांनी सरकारकडून कोणतेही लेखी आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे एल्गार मोर्चा ठरल्याप्रमाणे काढण्यावर काही आंदोलक ठाम होते. परिणामी काही कृती समितीच्या काही संयोजकांकडून मोर्चा नसून छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांना अभिवादन रॅली आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. तर काही संयोजकांनी एल्गार मोर्चा असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

सरकारच्या प्रतिनिधींकडून आंदोलनस्थळी भेट देण्यात आली नाही. तसेच मे गरुडा ॲम्युझमेंट पार्क. प्रा.लि.ला दिलेला कंत्राट रद्द केला नाही. स्मारक उभारण्याचे लेखी आश्वासन देखील मिळाले नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एल्गार मोर्चा काढण्यात आला असल्याचे 'एल्गार'च्या समर्थकांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT