Marathi Sahitya Sammelan  Sarkarnama
विदर्भ

Marathi Sahitya Sammelan Breaking : ९७ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड

सरकारनामा ब्यूरो

Pune : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९७ वे अमळनेर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावंही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. अखेर शोभणे यांच्या नावावर बहुमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या(Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदाची निवड रविवारी (दि.२५) जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत बहुमतानं रवींद्र शोभणे यांचं नाव निश्चित करण्यात आलं. संमेलनाच्या तारखांबाबतही या बैठकीत विचारविनिमय करण्यात आली. यावेळी डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. परंतु शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले. बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार करण्यात आला. डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

अमळनेर साने गुरुजी(Sane Guruji) यांची कर्मभूमी आहे. दुसर्यांदा अमळेनरला साहित्य संमेलनाच्या अक्ष्यक्षपदाचा बहुमान मिळाला होता. यापू्र्वीचं साहित्य संमेलन कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ मध्ये झालं होतं. त्यानंतर आता अमळनेर येथे ९७ व्या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

रवींद्र शोभणे यांचा परिचय...

ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे(Ravindra Shobhane) यांचा जन्म १५ मे १९५९ रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातल्या खरसोली गावी झाला आहे. डॉ. शोभणे हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द आहेत. त्यानंतर खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर नरखेड येथे महाविद्यालयीन शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयात पूर्ण केलं. १९८९ मध्ये त्यांनी पीएच.डी. ची पदवी मिळवली. कथालेखक म्हणूनही ते साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहेत. १९९१ मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता.

साहित्यसंपदा...

शोभणे यांच्या कोंडी, पडघम , पांढर,पांढरे हत्ती, प्रवाह,सव्वीस दिवस, तद्भव, रक्तध्रुव, अश्वमेध या कादंबरी आणि चंद्रोत्सव,दाही दिशा,शहामृग हे कथासंग्रह मराठी साहित्यात प्रसिध्द आहेत. तसेच त्यांना 'उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) चा पुरस्कार,मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कारविदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT