Jayant Patil Will Leaves NCP: भाजप म्हणते,जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार; 'ही' आहेत कारणे

जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Jayant Patil News
Jayant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil Will Leaves NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिड महिन्यापूर्वी राजीनाम्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेतेमंडळींनी या निर्णयाला विरोध केला. या गदारोळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले. बराच वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नेतेमंडळींच्या आग्रहाखातर त्यांनी नंतर तो निर्णय मागेही घेतला. (BJP says Jayant Patal will leave NCP; 'These' are the reasons)

या घटनेला दिड महिना उलटला असताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. पक्षाच्या कार्यध्यक्षपदाच्या नावाच्या घोषणेनंतर अजित पवार यांनीदेखील उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. असे असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट केला आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची १० कारणं असं कॅप्शनही दिलं आहे.

Jayant Patil News
BJP on Action Mode: पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर भाजप ॲक्शन मोडवर; मित्र पक्षांची बोलवली तातडीची बैठक

अशातच अजित पवार यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याची मागणी करत त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केल्याचे म्हटले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आहे. पक्षाच्या घटनेत प्रत्येकी तीन वर्षांनंतर पद बदलण्याची तरतूदही आहे. त्यामुळे अजित पवार यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी मागितल्याचे बोलले जात आहे.

वाचा, काय म्हटलं आहे, भाजपने या व्हिडीओत?

" जयंत पाटील यांचे अश्रू खरे होते पण त्याचं कारण वेगळं होतं. त्यामुळे जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2019 नंतर जयंत पाटील यांना झुलवत ठेवलं. कधीकाळी गृहमंत्रीपद भूषविलेल्या जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याऐवजी जलसंधारण मंत्रीपद देऊन त्यांची नाचक्की होती.

Jayant Patil News
Vishal Patil News : वसंतदादांचं स्वप्न सांगलीतील तीन 'व्ही' एकत्र येऊन साकारणार; विशाल पाटलांनी थोपटले दंड!

राष्ट्रवादीत एक सुप्रिया सुळे यांचा आणि दुसरा अजित पवार असे दोन गट. पण जयंत पाटील या दोन्ही गटाचे नाहीत. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीतील भविष्य अंधारातच राहिलं.

जयंत पाटील हे महत्त्वकांक्षी नेते. त्यांना पडलेली उपमुख्यमंत्री पदाची स्वप्नेही कुणापासून लपून राहिली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा दर्जाही गेला. त्यातच सुप्रिया सुळे आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्या, तर अजित पवार राज्य स्तरावरील सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ आहेत आपण केवळ नामधारी प्रदेशाध्यक्ष असल्याचं वाटतं आहे.

सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिल्यामुळे आता अजित पवार यांची नजर आता प्रदेशाध्यक्ष पदावर आहे. प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांकडे गेलं तर जयंत पाटील जाणार कुठे?

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी शक्यता होती. पण तसं झालं नाही.

कार्यकारी अध्यक्ष निवडतानाही शरद पवार यांनी पक्षातील दोन्ही गटांना खूश केलं. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलंय. तर, अजित पवार यांच्या जवळचे मानले जाणारे प्रफुल्ल पटेल यांनाही कार्यकारी अध्यक्षपद दिलं. इथेही जयंत पाटील यांचा विचार झाला नाही.

Jayant Patil News
Siddaramaiah News : कर्नाटक प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारलाही मुळासकट बाजूला करा! सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल

राज्यातील सर्व निर्णय अजित पवार घेतात, तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राजकारणाची सर्व सुत्रे शरद पवार यांच्या हातात आहेत. अशात जर शरद पवार यांनी राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घेतलीच तर जयंत पाटील यांना सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या हाताखाली काम करावं लागेल.

जयंत पाटील यांना आपला मुलगा प्रतिक पाटील याला राजकारणात आणायचं आहे.त्यासाठी त्यांनी मुलाला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडुनही आणलं. पण तरीही जयंत पाटील यांना शरद पवार यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.

या सर्व गोष्टींचा विचार करता,जयंत पाटील यांना राष्ट्रवादीत आपलं आणि मुलाचं भवितव्य दिसत नाहीये. शरद पवार यांच्या राजीनामाच्या वेळी जयंत पाटील यांनी भलेही रडण्याचं नाटकं केलं असलं तरी जयंत पाटील राष्ट्रवादीत खूप वैतागले आहेत. त्यामुळेच ते लवकरच राष्ट्रवादीला रामराम करु शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com