Eknath Shinde on Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : गोंदियातील कार्यक्रमात तुफान फटकेबाजी, म्हणाले...

Anil Deshmukh : नाव न घेता माजी पालकमंत्र्यांच्या 100 कोटी प्रकरणाची करून दिली आठवण

अभिजीत घोरमारे

Gondia Politics : गोंदिया-भंडारा जिल्ह्यांचे शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांविरुद्ध तुफान फटकेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मनोहर भाई पटेल यांच्या नावाने गोंदिया शहरात नगरपरिषदेच्या भवनासाठी 30 कोटी रुपयांची मागणी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची ही मागणी मान्य करत महायुतीचे सरकार देणारे आहे, घेणाऱ्यांचे नाही, असा अप्रत्यक्ष टोला विरोधकांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा गोंदियाचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटीच्या प्रकरणाची देखील त्यांनी नाव न घेता आठवण करून दिली.

गोंदियातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. आपल्याला नाही न बोलणारा मुख्यमंत्री मिळालेला आहे, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत करून दिली. थेट वत्कृत्वासाठी एकनाथ शिंदे ओळखले जातात. विधान भवन असो की जाहीर सभेचे व्यासपीठ त्यांच्या सडेतोड भाषणाची चर्चा नेहमीच होते. अशात गोंदियात अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले.

‘महाविकास’चे ‘लेन-देन’

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कसे ‘लेन-देन’ होत होते याची आठवणच करून दिली आहे. महायुतीमध्ये आपली सरकार निधी देण्यासाठी किती तत्पर असते याचे उदाहरण दिले. आपण कोणत्याही विकास कामाला नाही म्हणत नाही, असेही त्यांनी नमूद केले. शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारबद्दल स्तुतीसुमने उधळली. मोदी सरकारच्या मदतीने राज्य विकासाच्या दृष्टीने कसे अग्रेसर आहे, हे त्यांनी सांगितले. भविष्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कालापालट करणार

पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचा कायापालट होत आहे. जिल्ह्यात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. अशात सरकार या कामांसाठी व्यापक प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिताना दिली. शासनाजवळ विकासासाठी भरपूर निधी आहे. महायुतीमधील तीनही पक्ष सरकारची तिजोरी भरत आहेत. एकही नेता महाविकास आघाडी सरकारप्रमाणे स्वत:ची तिजोरी भरत नाही. त्यामुळे नागरिकांनी विकास कामांच्या बाबत निश्चिंत राहावे. विकासाच्या बाबतीत कोणाचीही निराशा होणार नाही, असा दावा शिंदे यांनी केला.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT