Eknath Shinde | Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde on Uddhav Thackeray : ''आंधळ्याची वरात येड्याच्या घरात'' म्हणत एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका!

Eknath Shinde latest updates : ''ज्यांनी रिजन दिले त्यांचा सिझन संपवून टाकला.'' असा टोलाही लगावला आहे ; जाणून घ्या, आणखी काय म्हटलं आहे एकनाथ शिंदेंनी?

Rajesh Charpe

Uddhav Thackeray Shivsena on Waqf Board Bill : : वक्फ बोर्ड विधेयकावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटावर टीका करायची आयती संधून चालून आली आहे. हाच मुद्दा पकडून गुरुवारी यवतमाळ येथील आभार सभेत त्यांनी उद्धव ठाकरेच्या सेनेची अवस्था ‘ना शेंडा बुडका, आंधळ्याची वरात येड्याच्या घरात' झाली असल्याचे सांगत खिल्ली उडवली. सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांना कंलक लावल्याचा आरोपही केला.

वक्फ विधेयकावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ''बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?'' असा सवाल उपस्थित करून ठाकरे गटावर एकप्रकारे दडपण आणले होते.

या विधेयकावरून ठाकरे गटाची कोंडी होणार असे बोलले जात होते. मात्र ठाकरे गटाने इंडिया आघाडीसोबत राहून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. याचा समाचार एकनाथ शिंदे यांनी घेतला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सेनेने आधीच हिंदुत्व सोडले होते. वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात जाऊन त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमीच वक्फ बोर्डाच्या विरोधात होते. ते नेहमीच सांगायचे, जो देशभक्त तो माझा आणि जो देशाचा दुश्मन तो माझा दुश्मन. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बाळासाहेबांचे ऐकले नाही. त्यांचे विचार पायदळी तुडवले. आता त्यांना जनता माफ करणार नाही.'' असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

याशिवाय ''लाडकी बहीण(Ladki Bahin Yojna) योजना आणली तेव्हा विरोधकांनी काहूर माजवले होते. बहिणींना आर्थिक मदत मिळू नये म्हणून कोर्टात गेले. भीक देताय का? असा आरोप आमच्यावर केला. मात्र माझ्या लाडक्या बहीण आणि भावांनी मिळून महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले. महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आमच्या योजना प्रिटिंग मिस्टेक नाही आणि फक्त निवडणुकीच्या घोषणा नाही हे आम्ही दाखवून दिले आहे.'' असा टोलाही लगावला.

तसेच '' सध्या आयपीएल सुरू आहे. त्यात कोण चॅम्पियन ठरेल हे शेवटच्या सामन्यातून कळेल. मात्र माझ्या महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला चॅम्पियन ठरवले असल्याची कोटी शिंदे यांनी केली. ‘तुम्हारा ये एसान कभी चुका नही सकता... मांगले अगर जान तो कभी इनकार कर नही सकता...सकता.'' अशी शायरी करून महायुतीचे सरकार नो रिजन ऑन दी स्पॉट डिसिजन आहे असे असून महाविकास आघाडी सारखे बघतो, पाहतो करणारे नसल्याचे ते म्हणाले. ज्यांनी रिजन दिले त्यांचा सिझन संपवून टाकला, असल्याचेही शिंदे यांनी सांगतिले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT