Waqf Amendment Bill update : विरोधी पक्षांना मोठा धक्का अन् 'NDA' आघाडीच्या विजयाचा मार्ग झाला आणखी सुकर!

Waqf Amendment Bill Rajyasabha : महत्त्वाच्या वेळी एनडीए आघाडीच्या कामी आला जुना मित्र ; जाणून घ्या, नेमका कोण आहे तो मित्र आणि काय घेतली आहे भूमिका?
Waqf Amendment Bill and modi
Waqf Amendment Bill and modisarkarnama
Published on
Updated on

Biju Janata Dal on Waqf Amendment Bill :मोदी सरकारसाठी वक्फ दुरूस्ती विधेयक राज्यसभेत पारीत करण्याचा मार्ग आता आणखी सुकर बनला आहे. कारण, एनडीए आघाडीच्या एका जुन्या मित्र पक्षाने म्हणजे ओडिशामधील नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलने(बीजेडी) आता यू-टर्न घेतला आहे. खरंत आधी बीजेडीने वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयकास विरोध करण्याची भूमिका घेतली होती आणि आपल्या खासदारांना वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान करण्यासही सांगितले होते. परंतु आता पक्षाने आपल्या खासदारांना स्वतंत्ररित्या मतदान करण्यास सूट दिलेली आहे.

बिजू जनता दलाने(BJD) ऐनवेळी अशी धक्कादायक भूमिका जाहीर केल्याने, राज्यसभेत आधीच अल्पमतात असणाऱ्या विरोधी पक्षांच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे राज्यसभेत विधेयक पारीत करण्यास आवश्यक असणाऱ्या सदस्य संख्येचा कोटा सहज पूर्ण करू शकणाऱ्या सत्ताधारी एनडीए आघाडीसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे. यामुळे एकप्रकारे एनडीए आघाडीचा जुना मित्रच ऐनवेळी त्यांच्या कामी आला असल्याचे दिसत आहे.

Waqf Amendment Bill and modi
Waqf Amendment Bill : लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही सोपा सरकारचा मार्ग? ; जाणून घ्या, काय आहे 'नंबर गेम'

बिजू जनता दलाने राज्यसभेत आपल्या खासदारांसाठी कोणताही व्हीप जारी केलेला नाही आणि काही विशिष्ट निर्देशही दिलेले नाहीत. पक्षाने घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. कारण, आधी असंच मानलं जात होतं की कधीकाळी भाजपचा(BJP) मित्र पक्ष राहिलेला बिजू जनता दल वक्फ विधेयकाच्या बाबतीत सरकारच्या विरोधातच भूमिका घेत मतदान करेल. मात्र आता त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यसभेतील संख्याबळाचे गणित एनडीए आघाडीसाठी अधिकच सोपे झाले आहे.

लोकसभेत(loksabha) वक्फ दुरुस्ती विधेयक सादर झाल्यानंतर अल्संख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले आहे. यावरून वाद विवाद सुरू आहेत. राज्यसभेत या क्षणी २३६ खासदार आहेत. बहुमतासाठी ११९ खादारांची आवश्यकता असणार आहे.

Waqf Amendment Bill and modi
Goa Politics Update: गोव्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री सावंतांनी तातडीने घेतली राज्यपालांची भेट!

वक्फ विधेयक पारीत करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीची स्थिती राज्यसभेतही चांगली आहे. ज्यामध्ये भाजपचे ९८, जदयू - ४, राष्ट्रवादीचे तीन, टीडीपीचे दोन आणि सहा नामनिर्देशित सदस्यांसह १२५ खासदार आहेत.

तर विरोधी आघाडी इंडि आघाडीजवळ ८८ खासदार आहेत. ज्यामध्ये काँग्रेसचे(Congress) २७ आणि तृणमूल काँग्रेसच्या १३ खासदारांचा समावेश आहे. जर नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील बीजेडीच्या सात खासादारांनी जरी विरोधकांच्या इंडि आघाडीला पाठिंबा दिला असता, तरीही त्यांच्या खासदारांची संख्या अपुरीच पडणार होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com