Waqf Amendment Bill : लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही सोपा सरकारचा मार्ग? ; जाणून घ्या, काय आहे 'नंबर गेम'

Waqf Amendment Bill Rajyasabha : लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक ३ एप्रिल रोजी १२ तासांच्या प्रदीर्घ वाद विवादानंतर पारित केले गेले आहे. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले गेले आहे.
Waqf Amendment Bill
Waqf Amendment BillSarkarnama
Published on
Updated on

Waqf Act Rajya Sabha voting : लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर झाल्यानंतर अल्संख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले आहे. यावरून वाद विवाद सुरू आहेत. राज्यसभेत या क्षणी २३६ खासदार आहेत. बहुमतासाठी ११९ खादारांची आवश्यकता असणार आहे.

लोकसभेत(Loksabha) वक्फ दुरुस्ती विधेयक ३ एप्रिल रोजी १२ तासांच्या प्रदीर्घ वाद विवादानंतर पारित केले गेले होते. यावेळी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने २८८ सदस्यांनी आणि याच्याविरोधात २३२ सदस्यांनी मतदान केले.

राज्यसभेबाबत(RajyaSabha) बोलायचे झाले तर, विधेयकास पारीत करण्यासाठी सत्ताधारी एनडीए आघाडीला ११९ मतांची गरज असेल आणि स्वतंत्र व नामनिर्देशित सदस्यांच्या पाठिंब्याने ही संख्या १२५ होईल. अशावेळी केंद्रातील मोदी सरकारला हे विधेयक पारीत करण्यासाठी जास्त अडचणींचा सामना नाही करावा लागणार.

Waqf Amendment Bill
BJP : स्थापना दिनानिमित्त भाजपचे 'स्पेशल सेलिब्रेशन', आठवडाभर जंगी कार्यक्रमांची रेलचेल

वक्फ विधेयक पारीत करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीची स्थिती राज्यसभेतही चांगली आहे. ज्यामध्ये भाजपचे(BJP) ९८, जदयू - ४, राष्ट्रवादीचे तीन, टीडीपीचे दोन आणि सहा नामनिर्देशित सदस्यांसह १२५ खासदार आहेत.

Waqf Amendment Bill
Vande Bharat Express : 'आयफेल टॉवर'पेक्षाही अधिक उंच पूलावरून धावणार 'वंदे भारत एक्स्प्रेस'

तर विरोधी आघाडी इंडि आघाडीजवळ ८८ खासदार आहेत. ज्यामध्ये काँग्रेसचे(Congress) २७ आणि तृणमूल काँग्रेसच्या १३ खासदारांचा समावेश आहे. जर नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील बीजेडीच्या सात खासादारांनी जरी विरोधकांच्या इंडि आघाडीला पाठिंबा दिला, तरीही त्यांच्या खासदारांची संख्या अपुरीच आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांचे कमी संख्याबळ असणे, त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com