Eknath Shinde, Devendra Fadnavis  Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde News : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमात महिलांचेच हाल; तीन तास उशीर, पाण्यासाठी धावाधाव

CM Eknath Shinde And DY CM Devendra Fadnavis In Gadchiroli : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण या राज्यस्तरीय अभीयानाचा शुभारंभ आज गडचिरोलीतून करण्यात आला...

संदीप रायपूरे

Eknath Shinde And Devendra Fadnavis Gadchiroli Visit :

आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. पण गेल्या काळात जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गडचिरोलीच्या डिक्शनरीतून आपणाला नक्षलग्रस्त हा शब्द वगळायचा आहे. सुरजागडच्या माध्यमातून जिल्ह्यातील दहा हजार भूमीपुत्रांना रोजगार मिळाला आहे. आता पुन्हा अनेक कंपन्या गडचिरोलीत येऊ घातल्या आहेत. येणाऱ्या दिवसात गडचिरोलीला देशाची स्टील सिटी करण्याचा आपला मानस आहे, असे ठाम मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.

एकनाथ शिंदे हे याआधी गडचिरोलीचे पालकमंत्री होते. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही धुरा आहे. गडचिरोलीत आज विविध शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा शुभारंभ तथा भूमिपूजन यावेळी पार पडले. आजचा दिवस हा राज्यातील महिलांच्या आयुष्यात नवी क्रांती आणणारा दिवस असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आम्ही सुरजागड हा मायनींग प्रकल्प सुरू केला. त्याला विरोध करण्यात आला होता. आता मात्र यातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगाराची संधी मिळाली आहे. गडचिरोलीच्या महिलांना सक्षम करण्यासाठी आपण जिवाची बाजी लावू, असेही ते म्हणाले. यावेळी गडचिरोलीच्या जिल्हा प्रशासनाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताची संकल्पना मांडली आहे. त्यातूनच देशभरात महिला सक्षमीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. गडचिरोलीतून सुरू झालेले हे अभियान महिलांच्या आर्थिक विकासाचे मोठे स्त्रोत ठरणार आहे. गेल्या वर्षात राज्यातील बचत गटांना सात हजार कोटी रूपयांचे कर्ज मिळवून दिले असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गडचिरोलीत उद्योग येत आहेत. त्याचा पूर्ण फायदा हा केवळ अन् केवळ भूमीपूत्रांनाच झाला पाहिजे याकरिता आम्ही प्राधान्य देत आहोत. कपंन्याना स्थानिकांना रोजगार देण्याबाबात सक्तीने आदेश देण्यात आले आहेत. गडचिरोलीत लवकरच एअरपोर्ट व मेडीकल कॉलेज सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संपूर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रांनी आदिवासीच्या परंपंरागत डोक्यावरील छत्री लावली होती. यावेळी गडचिरोलीचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मिना, डिआयजी संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोल्पल, सीईओ आयुषी सिंग यांची यावेळी उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तीन तास उशिर...

गडचिरोली येथील कोडगल रोडवर एमआयडीसी मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल तीन तास उशिरा हा कार्यक्रम सुरू झाला. याचा मोठा फटका गडचिरोलीतील दुरदुरून आलेल्या महिलांना बसला. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना धावाधाव करावी लागल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT